Join us

​ किशोरी शहाणे : एका चांगल्या शाळेत माझी भरती झाली आणि मी घडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 9:38 AM

- रूपाली मुधोळकरअभिनेत्री  किशोरी शहाणे म्हणजे सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व.  मराठी चित्रपट, मराठी मालिका आणि मराठी रंगभूमीसोबतच हिंदी सिनेमा, ...

- रूपाली मुधोळकरअभिनेत्री  किशोरी शहाणे म्हणजे सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व.  मराठी चित्रपट, मराठी मालिका आणि मराठी रंगभूमीसोबतच हिंदी सिनेमा, हिंदी मालिका अशा सगळ्याठिकाणी वावर असणाºया किशोरीशी मनमोकळ्या गप्पा मारण्याचा योग अलीकडे आला. लोकमत व रिन प्रस्तृत ‘जलसमृद्ध महाराष्ट्र’ अभियानाच्या निमित्ताने किशोरी नागपुरात आली. नागपुरातील या दिवसभरातील भेटीत किशोरीच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक बाबी ठळकपणे जाणवल्या. अभिनेत्रीसोबत किशोरी  बॉलिवूडमध्ये येऊ पाहणा-या मुलाची एक जबाबदार आई, एक कर्तव्यदक्ष पत्नी आणि तितकीच जागृत नागरिक आहे, हे पदोपदी जाणवले. किशोरीशी मारलेल्या गप्पांचा हा सारांश...प्रश्न : ‘मिस मिठीबाई’(मिठीबाई कॉलेजमध्ये शिकत असताना किशोरीने मिस मिठीबाईचा किताब जिंकला होता) ते एक यशस्वी अभिनेत्री हा प्रवास कसा राहिला?किशोरी : अतिशय अद्भूत, असेच मी या संपूर्ण प्रवासाचे वर्णन करेल. खरे तर कुठलाही गॉडफादर नसताना, कुठलीही पार्श्वभूमी नसताना अगदी योगायोगाने मी सिनेसृष्टीत आले आणि इथली कधी झाले, ते माझे मलाही कळले नाही. मेहनत घ्यायची तयारी होतीच. पण नशीबाने संधीही मिळत गेल्यात. या संधींचे मी सोने केले. आठवीत असताना बालनृत्य नाटिकेतून माझा प्रवास सुरू झाला आणि नंतर व्यावसायिक नाटकांकडे मी वळले. यानंतर मालिका, चित्रपट अशा टप्प्याटप्प्याने मी समोर गेले. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन अशा दिग्गजांसोबत मला काम करायला मिळाले. ते त्यावेळी सुपरस्टार होते. त्यामुळे,एका चांगल्या शाळेत माझी भरती झाली आणि मी घडले, असेच मी म्हणेल.प्रश्न : किशोरी, तू आजही अगदी जशीच्या तशी दिसतेस. तुझ्या या अजरामर तारूण्याचे रहस्य काय?किशोरी : (खळखळून हसत हसत) मी सतत हसत असते, कदाचित म्हणून मी इतकी तरूण दिसत असेल. पण खरे सांगायचे तर कायम ताजेतवाने आणि टवटवीत दिसणे, ही आमच्या क्षेत्राची गरज आहे. यासाठी पौष्टिक आहार आणि व्यायाम याला काहीही पर्याय नाही. सातच्या ठोक्याला शूटींगसाठी बाहेर पडत असताना ब्रेकफास्टपासून तर रात्रीच्या जेवणापर्यंतचे डबे माझ्यासोबत असतात. पहाटे उठून व्यायाम, हा दंडक आजही मी पाळते. कदाचित या रूजलेल्या शिस्तीची फळे तारूण्याच्या रूपात मला मिळत असावीत. प्रश्न : हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत अशा दोन्ही ठिकाणी तू लिलया वावरतेस. पण या दोन्ही ठिकाणी वावरताना तुला काही फरक जाणवतो का?किशोरी : अजिबात नाही. केवळ ‘व्याप्ती’चा तेवढा फरक आहे. म्हणजे, मराठीत तुम्ही केवळ महाराष्ट्रापुरते ओळखले जाता आणि हिंदीत तुम्हाला जगभर ओळख मिळते. यापलीकडे दुसरा कुठलाही फरक मला जाणवला नाही.नृत्यांगणा, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती यापैकी कुठली ओळख तुला मिरवायला आवडते?किशोरी : अ‍ॅक्टिंग हेच माझे पॅशन आहे. खरे तर मला माझ्या डान्समुळे सर्वाधिक लोकप्रीयता मिळाली. पण अभिनयाने मला मनस्वी आनंद दिला. त्यामुळे तसे विचाराल तर अभिनेत्री म्हणून मिरवायलाच मला अधिक आवडते.  प्रश्न : या प्रवासात कुठली अशी एक गोष्ट राहून गेली, ज्याची तुला खंत वाटते?किशोरी : स्वत:साठी न मिळालेला वेळ, ही खंत मला आहेच. या क्षेत्रात मी दुप्पट मेहनत घेतली. बी कॉम होईपर्यंत मी २० सिनेमांची हिरोईन झाले होते. पुढेही हा प्रवास अखंड सुरू राहिला. त्यामुळे स्वत:साठी वेळ तसा मिळालाच नाही. आजही मी सतत बिझी असते. अर्थात हे ‘बिझीपण’ मी मनापासून एन्जॉय करते.प्रश्न : थोडं मागे वळून बघितल तर एक मराठमोळी मुलगी एका पंजाबी कुटुंबात सून म्हणून रमते. हा अनुभव कसा राहिला?किशोरी : माझा जन्मच जणू पंजाबी कुटुंबात झाला, असे मला राहून राहून वाटते. त्यांचं राहणं, खाणं सगळच मला जाम आवडत. माझ माहेर  शुद्द शाकाहारी. पण शाळेत मैत्रिणींच्या डब्यातील नॉनव्हेज मी आवडीने खायचे. पंजाबी कुटुंबात आल्यानंतर तर मग खाण्याची चैनच झाली.प्रश्न : तुझा मुलगा बॉबी बॉलिवूड पदार्पणासाठी तयार आहे. त्याला आई म्हणून काय सल्ला देशील?किशोरी : कष्ट आणि चिकाटी याला पर्याय नाही, हेच मी त्याला सांगेल. मला सहज सोप्या पद्धतीने काहीही मिळालेले नाहीय. मी पण खूप कष्ट केलेत. त्याकाळात इतकी स्पर्धा नव्हती. आता प्रचंड स्पर्धा आहे. पण तेवढीच माध्यमंही आहेत. इथे करता येण्यासारखे खूप काही आहे.  जीवतोड प्रयत्न कर आणि उरलेलं सगळं नशीबावर सोड, इतकंच आई म्हणून मी त्याला सांगेल.प्रश्न : लोकमतच्या ‘जलसमृद्ध महाराष्ट्र’ अभियानाबद्दल काय सांगशील?किशोरी : संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घ्यावा, असा लोकमतचा हा उपक्रम आहे, असे मी म्हणेल. या अभियानात सामील होणे, महाराष्ट्राचे सुजान नागरिक या नात्याने आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. पाण्याचा थेंब आणि थेंब महत्त्वाचा आहे. तो वाचवा, रूजवा, असे मी सांगले. केवळ इतरांनाच सांगायचे म्हणून नाही तर लोकमतच्या या मोहिमेचा भाग म्हणून माझा सुद्धा हाच प्रयत्न असेल.प्रश्न :तुझे येणारे प्रोजेक्टस?cnxoldfiles/strong> लवरकच माझा ‘सिमरन’ हा हिंदी सिनेमा येतोय. यात मी कंगना राणौतच्या आईची भूमिका केलीय. याशिवाय निर्मिती सावंत आणि मी आम्ही दोघींची ‘जाडूबाई जोरात’ ही एक मालिका येतेय.  १५ आॅगस्ट वि. २६ जानेवारी हा मराठी सिनेमा तुम्हाला पाहायला मिळणार आहे.