आजच्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन आणि विशेषत: लिप-लॉक सीन्स असणे सामान्य झाले आहे. त्यापेक्षा चुंबन दृश्यांशिवाय चित्रपट बनवणे फार दुर्मिळ झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, की भारतीय फिल्म इंडस्ट्रीत किसिंग सीन किंवा लिपलॉकचा ट्रेंड कधीपासून सुरू झाला? लिपलॉक असलेल्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे नाव तुम्हाला माहीत आहे का?
पहिला हिंदी चित्रपट ज्यामध्ये लिप-लॉक सीन स्क्रीनवर दाखवण्यात आला होता तो स्वातंत्र्यापूर्वीच शूट करण्यात आला होता. त्या काळात, लिपलॉक सोडा, अगदी रोमँटिक सीन शूट करणे ही मोठी गोष्ट होती. पण अशा काळात पहिला लिपलॉक सीन शूट झाला आणि या चित्रपटाचं नाव होतं 'कर्मा'. हा चित्रपट १९३३ मध्ये प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये देविका राणी आणि हिमांशू राय यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
किसिंग सीन ४ मिनिटं चालला!पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री देविका राणी त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. १९३०-४० च्या दशकात, अभिनेत्रीचे कौशल्य मजबूत मानले जात असे. त्यांनी हिमांशू राय यांच्यासोबत 'कर्मा' चित्रपटात काम केले होते. १९३३ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटासाठी हिमांशूसोबत ४ मिनिटांचा किसिंग सीन केला होता. या सीनमध्ये हिमांशूला साप चावतो आणि तो बेशुद्ध होतो. यावेळी देविका त्याला पुन्हा पुन्हा किस करते.
पतीसोबत केले लिपलॉक देविका राणी आणि हिमांशू राय यांचे या चित्रपटापूर्वीच लग्न झाले होते. म्हणजे 'कर्मा' या चित्रपटात देविका इतर कोणाशी नाही तर तिच्या पतीसोबत लिप-लॉक करत होती. उल्लेखनीय बाब ही आहे की, हिमांशू राय या चित्रपटात केवळ अभिनेता म्हणून काम करत नव्हते तर ते या चित्रपटाचे निर्मातेही होते.