Join us

'वेड'मध्ये पती रितेशसोबत किसींग सीन, पण दुसऱ्या अभिनेत्यांसोबत..., किसींग सीनवर जिनिलिया देशमुख म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 10:05 AM

Genelia Deshmukh : जिनिलिया लवकरच ट्रायल पिरिएड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती तब्बल १० वर्षांनंतर हिंदी सिनेमात काम करताना दिसणार आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया(Tamannah Bhatia)ने तब्बल १८ वर्षांनंतर नो किसींग पॉलिसी मोडली आहे. तर नुकतेच काजोलने द ट्रायलमध्येही किसिंग सीन दिला आहे. मात्र वेड चित्रपटात रितेश देशमुखसोबत किसिंग सीन देणारी अभिनेत्री जिनिलिया डिसूझा-देशमुखने ऑनस्क्रीन किसिंग सीन देणार नसल्याचे म्हटले आहे. जिनिलिया लवकरच ट्रायल पिरिएड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती तब्बल १० वर्षांनंतर हिंदी सिनेमात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात ती सिंगल मदरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने एका मुलाखतीत ऑनस्क्रीन किसींग सीनवर भाष्य केले आहे.

वेड चित्रपटात जिनिलिया नवरा रितेश देशमुखसोबत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. यात ते दोघे नवरा बायकोच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचा किसिंग सीन होता. या सीन्सची खूप चर्चा झाली होती. मात्र इतर कोणासोबत किसींग सीन देणार नाही, असे जिनिलियाने सांगितले आहे. मी अजिबात कम्फर्टेबल नाहीकिसिंग सीनबद्दल जिनिलिया देशमुख म्हणाली की, किसींग सीन शूट करताना मला अजिबात कम्फर्टेबल वाटणार नाही. त्यामुळे स्क्रीनवर चांगलं दिसणार नाही आणि पडद्यावर खरे, खोटे सगळे दिसते. त्यामुळे स्क्रीनवर मला नीट अभिनय करता येणार नाही. तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर ती तुम्ही मनापासून करावी.

'वेड'ला प्रेक्षकांचं मिळालं खूप प्रेममागील वर्षी रितेश-जेनेलिया देशमुखचा 'वेड' (Ved) हा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केले. तर, जिनिलियाने मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री केली. त्यामुळे या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. इतकेच नाही तर या चित्रपटाने अनेक पुरस्कारही पटकावले.

टॅग्स :जेनेलिया डिसूजातमन्ना भाटियारितेश देशमुख