बॉलिवूडचा लाडका सिंगर केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ (KK Krishnakumar Kunnath) याच्या मृत्यूच्या बातमीनं सगळ्यांना हादरवून सोडलं. चाहते अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. केके आपल्यात नाही, यावर अद्यापही चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये. 31 मे 2022 च्या रात्री एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान केकेची प्रकृती बिघडली आणि यानंतर काही तासांतच त्याच्या मृत्यूची बातमी आली. त्यांच्या मृत्यूने एकीकडे हळहळ व्यक्त होत असताना आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडू लागल्या. मात्र, केके यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्यानेच झाल्याचा निष्कर्ष शवचिकित्सा अहवालात काढण्यात आला आहे.
गायिकेने केला खुलासा गायिका शुभलक्ष्मी डे यांनी 31 मे रोजी कोलकात्याच्या सभागृहात केकेसोबत परफॉर्म केलं. त्यांनी त्यादिवशी नेमकं तिकडे काय घडलं याबाबत एका मुलाखती दरम्यान खुलासा केला आहे. आजूबाजूची प्रचंड गर्दी पाहिल्यानंतर केके फार अस्वस्थ झाला होता. गर्दी पाहून सिंगर केकेने आपल्या कारमधून बाहेर पडण्यासही नकार दिला होता. पण त्यानंतर त्यांनी काहीवेळ परफॉर्म केलं आणि अचानक त्यांची तब्येत बिघडली. स्टेजवर आल्यानंतर त्याने लाईट्स देखील मंद करण्यास सांगितलं होतंय. जर त्याने त्यावेळी तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं असतं तर कदाचित आम्ही शो रद्द केला असता, अस त्या मुलाखती दरम्यान म्हणाल्या.
नेमके काय घडले?पोलिसांनी सांगितले की, गाण्यांच्या कार्यक्रमानंतर मंगळवारी केके हॉटेलमध्ये परतले. ते ज्या हॉटेलमध्ये राहात होते तेथील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार आहे. केके यांचे कोलकातात दोन महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम होते. नझरूल मंच सभागृहामध्ये केके यांनी कार्यक्रम सादर केल्यानंतर शेकडो चाहत्यांचा त्यांना गराडा पडला होता.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी केकेला बॉलिवूडमध्ये गाण्याची पहिली संधी दिली होती. ‘माचीसा चित्रपटामधील छोड आये हम... हे त्याचं गाणं तुफान गाजलं होतं. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या हम दिल चुके सनम या चित्रपटामधील ‘तड़प तड़प के...’ या केकेच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हिंदी चित्रपटांमध्ये केकेनं 200 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत.