Join us

KKची ही अजरामर गाणी ऐकून डोळ्यांत अश्रू येतील...; ऐका गायकाचे टॉप 10 सॉन्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 13:03 IST

KK Top 10 Greatest Hits: केकेनं बॉलिवूडला अजरामर गाणी दिली. त्याच्या आवाजातील ही टॉप 10 गाणी ऐकून तुमच्याही डोळ्यांच्या कडा ओलावतील...

KK death: केके नावानं ओळखला जाणारा तुम्हाआम्हा सर्वांचा लाडका सिंगर कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath)आज आपल्यात नाही. वयाच्या 53 व्या वर्षी केकेनं अचानक जगाचा निरोप घेतला. केके आपल्यात नाही, यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. चाहते सुन्न झाले आहेत. संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. केकेनं बॉलिवूडला अजरामर गाणी दिली. त्याच्या आवाजातील ही टॉप 10 गाणी ऐकून तुमच्याही डोळ्यांच्या कडा ओलावतील...

यारों..., हे केकेचं सर्वाधिक लोकप्रिय गाणं... यारों मोहब्बत ही तो बंदगी है... हे केकेच्या आवाजातील गाणं ऐकणं एक वेगळा अनुभव आहे.

ऐसा क्या गुनाह किया कि लुट गए... हम दिल दे चुके सनम या गाण्यातील केकेनं गायलेलं हे गाणं आठवून आज सगळेच चाहते हळहळणार हे नक्की...

खुदा जाने... बचना ऐ हसीनो या दीपिका व रणबीरच्या चित्रपटातील हे गाणं केकेनं गायलं होतं. हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं होतं.

जरा सा... इमरान हाश्मीच्या जन्नत या चित्रपटातील हे गाणं तुम्ही नक्की ऐकलं असेलच.

तुही मेरी सब है... हे गँगस्टर चित्रपटातील गाणं केकेनं गायलं होतं. इमरान हाश्मीच्या चित्रपटातील बहुतांश गाणी केकेनं गायले आहेत.

जिंदगी दो पल की.... काइट्स या चित्रपटातील हे गाणंही केकेनं गायलं होतं. जिंदगी दो पल की... हे केकेनं जणू खरं ठरवलं.

आंखों में तेरी... ओम शांती ओम या दीपिका व शाहरुखच्या चित्रपटातील केकेच्या आवाजातील या गाण्यानं चाहत्यांना वेड लावलं होतं.

तू जो मिला... बजरंगी भाईजान या चित्रपटातील हे गाणं आठवत असेलच. हे गाणंही केकेनं गायलं होतं.

आशांए... इक्बाल या चित्रपटातील केकेच्या या गाण्यानं सर्वांना वेड लावलं होतं.

आवारापण बंजारापण... हे केकेनं गायलेलं आणखी एक लोकप्रिय गाणं.

 

टॅग्स :केके कृष्णकुमार कुन्नथसंगीतबॉलिवूड