'याद आएंगे ये पल...' गाता गाता फॅन्सना रडवून गेला केके, शेवटच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 09:55 AM2022-06-01T09:55:03+5:302022-06-01T09:56:45+5:30

KK Last Performance Video: केकेच्या अशा अचानक जाण्याने फॅन्स आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. केकेने हिंदीसोबत तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील सिनेमांची गाणीही गायली होती.

KK last concert video singer KK's last performance video moments before death watch | 'याद आएंगे ये पल...' गाता गाता फॅन्सना रडवून गेला केके, शेवटच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ व्हायरल

'याद आएंगे ये पल...' गाता गाता फॅन्सना रडवून गेला केके, शेवटच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

KK Last Performance Video: KK नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) चं मंगळवारी रात्री कोलकातामध्ये निधन झालं. कोलकातामध्ये एका कॉन्सर्टनंतर केकेची तब्येत अचानक बिघडली होती. यानंतर त्याला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.  

केकेच्या अशा अचानक जाण्याने फॅन्स आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. केकेने हिंदीसोबत तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील सिनेमांची गाणीही गायली होती. केकेचं वय केवळ ५३ वर्षे होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहसहीत अनेकांनी त्याच्या निधनावर दु:खं व्यक्त केलं आहे. 

रिपोर्टनुसार, केके दोन दिवसांच्या कॉन्सर्टसाठी कोलकाता येथे आला होता. सोमवारीही केकेचं एक कॉन्सर्ट झालं होतं. विवेकानंद कॉलेजमध्ये त्याने कॉन्सर्ट केला होता. पण दुसऱ्या दिवशी कॉन्सर्टनंतर त्याची तब्येत बिघडली होती. 

केकेच्या शेवटच्या कॉन्सर्टचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तो त्याचं प्रसिद्ध गाणं ‘हम रहें या ना रहें कल…’ गाताना दिसत आहे. केकेची अनेक गाजलेली गाणी ही नेहमी त्याच्या फॅन्ससोबत राहणार आहे. 
 

Web Title: KK last concert video singer KK's last performance video moments before death watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.