KK Death News, Cricket Fraternity | प्रसिद्ध गायक केके (Krishnakumar Kunnath) यांचे वयाच्या ५३व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलकाताच्या एका कॉलेज फेस्टमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट (Live Concert) सुरू असताना त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला रूग्णालयात नेण्यात आले. पण त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्याच्या अकाली निधनाने संपूर्ण संगीतविश्व हळहळलं. बॉलिवूडच्या चित्रपटांमधील केकेची अनेक गाणी गाजली. त्याने गायलेली अनेक गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. केकेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून त्यांला श्रद्धांजली (Mourne) व्यक्त केली जात आहे. क्रिकेटविश्वानेही त्याच्या अकाली एक्झिटबद्दल दु:ख व्यक्त केले.
"कोलकातामध्ये लाईव्ह शो करत असताना प्रसिद्ध गायक केके याचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी मिळाली. त्याच्या जाण्याने आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली. माझ्या सहवेदना त्याच्या कुटुंबीयांसोबत आहेत. ओम शांती", अशा शब्दांत सेहवागने आपल्या भावना व्यक्त केल्या. तर "आयुष्य हे अनिश्चित आणि फारच नाजूक असतं. केकेच्या मृत्यूने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. देव त्याच्या कुटुंबीयांना हे दु:ख पचवण्याचे बळ देवो", अशा शब्दांत युवराजने आपल्या भावनांना वाट करून दिली. पाहूया काही निवडक ट्वीट्स-
--
--
--
--
दरम्यान, बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक केके म्हणजेच कृष्ण कुमार कुन्नथ याचं कोलकातामध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या ५३ व्या वर्षी केके यांनी जगाचा निरोप घेतला. केकेच्या डोक्यावर आणि ओठावर जखमांच्या खुणा आहेत. त्यामुळे विविध तर्क लढवले जात आहेत. अजून पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही. मृत्यूचं खरं कारण पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येईल. सध्या याप्रकरणी न्यू मार्केट पोलीस स्टेशनमध्ये अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पण प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे.