Join us

KL Rahul-Athiya Shetty : केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाच्या तारखेबद्दल सुनील शेट्टीचा मोठा खुलासा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 16:24 IST

KL Rahul-Athiya Shetty : बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील प्रसिद्ध जोडपे केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नाचे वृत्त बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत.

बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील प्रसिद्ध जोडपे केएल राहुल (KL Rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या लग्नाचे वृत्त बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. याआधी, दोघेही जानेवारीत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तसे, या जोडप्याच्या लग्नाबद्दल काही नवीन अपडेट्स समोर येत आहेत. यापूर्वी २३ जानेवारी २०२३ रोजी दोघेही सात फेर्‍या घेणार असल्याची चर्चा होती. या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि काही जवळचे लोक येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. दोघांच्या लग्नाचे सर्व फंक्शन्स सुनील शेट्टीच्या घरी पार पडणार आहेत. मात्र आता अभिनेत्रीचे वडील सुनील शेट्टीनेच या वृत्तांचे खंडन केले आहे.

एका मुलाखतीत अथिया शेट्टीचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टी लग्नाबाबतच्या अफवांवर म्हणाला, लग्नाची तारीख निश्चित झाल्यावर मलाही सांगा. जेणेकरून मी स्वतः लग्नाला उपस्थित राहू शकेन. तसे, सुनील शेट्टीच्या या उत्तरावरून अथियाच्या लग्नाच्या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तथ्य नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कुटुंब अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहेत. रिपोर्ट्समध्ये केलेल्या दाव्यानुसार, क्रिकेटर केएल राहुलनेही लग्नासाठी वैयक्तिक रजा घेतली आहे आणि बीसीसीआयनेही त्याला मान्यता दिली आहे. तर सुनील शेट्टीने हे लग्न जानेवारीत होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मग लग्न कधी, कोणत्या तारखेला होणार? सध्या तरी अथिया आणि केएल राहुलच्या लग्नासाठी आता दोघांच्या कुटुंबीयांकडून या वृत्ताला दुजोरा कधी मिळणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :अथिया शेट्टी सुनील शेट्टीलोकेश राहुल