KL Rahul Athiya Shetty Wedding: अखेर केएल राहुलसोबतच्या लग्नाच्या वृत्तांवर अथिया शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 12:06 PM2022-05-07T12:06:44+5:302022-05-07T12:07:10+5:30
KL Rahul Athiya Shetty Wedding: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी प्रोफेशनल लाइफपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत येत असते. बऱ्याच दिवसांपासून ती या वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी(Athiya Shetty)चे पर्सनल लाइफ सध्या चर्चेत आले आहेत. बऱ्याच दिवसांपासून ती या वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul)सोबत लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर दोघेही मुंबईतील वांद्रे येथील एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहेत, जे त्यांनी नुकतेच विकत घेतले आहे.
घर विकत घेतल्याच्या सततच्या अफवांमुळे अथियाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, मी कोणासोबत दुसरीकडे राहणार नाही, मी माझ्या आई वडिलांसोबत राहणार आहे. मी आणि माझे कुटुंब आमच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहोत. सध्या अथिया तिचे आई-वडील सुनील शेट्टी, माना शेट्टी आणि भाऊ अहान शेट्टीसोबत दक्षिण मुंबईतील अल्टामाऊंट रोडवरील घरात राहत आहेत.
याच मुलाखतीत जेव्हा अथियाला केएल राहुलसोबतच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, याविषयी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मी देणार नाही. या सगळ्या गोष्टींनी मी कंटाळले आहे. मी फक्त त्यांच्यावर हसू शकते. लोकांना काय विचार करायचा आहे याचा विचार करू द्या.
गेल्या काही काळापासून अथियाचे नाव सतत केएल राहुलसोबत जोडले जात आहे. या सामन्यात अथिया अनेकदा केएल राहुलला चिअर करतानाही दिसली होती. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसले आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अथियाने २०१५ साली सूरज पांचोलीसोबत हिरो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मोतीचूर चकनाचूर या चित्रपटात झळकली होती.