बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी(Athiya Shetty)चे पर्सनल लाइफ सध्या चर्चेत आले आहेत. बऱ्याच दिवसांपासून ती या वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul)सोबत लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर दोघेही मुंबईतील वांद्रे येथील एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहेत, जे त्यांनी नुकतेच विकत घेतले आहे.
घर विकत घेतल्याच्या सततच्या अफवांमुळे अथियाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, मी कोणासोबत दुसरीकडे राहणार नाही, मी माझ्या आई वडिलांसोबत राहणार आहे. मी आणि माझे कुटुंब आमच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहोत. सध्या अथिया तिचे आई-वडील सुनील शेट्टी, माना शेट्टी आणि भाऊ अहान शेट्टीसोबत दक्षिण मुंबईतील अल्टामाऊंट रोडवरील घरात राहत आहेत.
गेल्या काही काळापासून अथियाचे नाव सतत केएल राहुलसोबत जोडले जात आहे. या सामन्यात अथिया अनेकदा केएल राहुलला चिअर करतानाही दिसली होती. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसले आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अथियाने २०१५ साली सूरज पांचोलीसोबत हिरो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मोतीचूर चकनाचूर या चित्रपटात झळकली होती.