Join us

Flashback : चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि पळून जाऊन लग्न केले...! अशी आहे शक्ती कपूर यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 3:02 PM

श्रद्धा इतकीच सुंदर आहे श्रद्धाची आई

ठळक मुद्देपहिल्याच भेटीत शिवांगी यांना शक्ती आवडले होते.

शक्ती कपूर यांनी बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान जागा निर्माण केले आहे.  शक्ती कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी श्रद्धा कपूरने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. श्रद्धा कपूरने खूपच कमी वेळात एक अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. आशिकी 2, एक व्हिलन,  एबीसीडी 2, बागी,  स्त्री  अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या. पण आज आम्ही श्रद्धा नाही तर तिचे डॅड शक्ती कपूर यांच्या लव्हस्टोरीबद्दल  सांगणार आहोत.

शक्ती कपूर गेली अनेक वर्षं चित्रपटसृष्टीचा भाग आहेत. पण त्यांची पत्नी सुद्धा एकेकाळी बॉलिवूडमध्ये होत्या.  शक्ती कपूर यांनी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेची बहीण शिवांगी कोल्हापूरेसोबत लग्न केले. 1980 साली ‘किस्मत’ या चित्रपटातून शिवांगी यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि रंजीता प्रमुख भुमिकेत होते. शक्ती कपूर यांचीही यात एक खास भूमिका होती. शक्ती आणि शिवांगी यांची पहिली भेट याच सिनेमाच्या सेटवर झाली होती.

 खरे तर ‘किस्मत’ हा चित्रपट आधी पद्मिनी कोल्हापूरेला ऑफर करण्यात आला होता. पण काही कारणास्तव पद्मिनीला या चित्रपटात काम करणे शक्य झाले नाही आणि या चित्रपटात शिवांगी यांची वर्णी लागली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. पण याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शिवांगी आणि शक्ती कपूर यांच्यात अफेअर सुरू झाले आणि त्यांनी 1982 मध्ये कोर्टात लग्न केले.

शिवांगी आणि शक्ती कपूर यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. शक्ती आणि शिवांगी एकाच चित्रपटात असले तरी त्या दोघांचा एकही सीन एकत्रित शूट होणार नव्हता. त्यामुळे त्यांना चित्रीकरणासाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या होत्या. पण शुटिंगच्या तारखा ऐनवेळी बदलल्याने त्यांना एकाच तारखांना चित्रीकरणाला बोलवण्यात आले आणि त्यांची भेट झाली.

पहिल्याच भेटीत शिवांगी यांना शक्ती आवडले होते. त्या दोघांनी दोन वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. पण या लग्नाला शिवांगीच्या घरातल्यांचा विरोध होता. शिवांगी या लग्नाच्यावेळेस केवळ 18 वर्षांच्या होत्या. घरातल्यांचा विरोध असल्याने शिवांगी यांनी घरातून पळून लग्न केले होते. लग्नानंतर देखील अनेक वर्षं शिवांगी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये काहीच संपर्क नव्हता. पण श्रद्धा आणि सिद्धांतच्या जन्मानंतर शिवांगी यांच्या कुटुंबियांनी त्यांना स्वीकारले.

टॅग्स :शक्ती कपूर