‘तान्हाजी-द अनसंग वॉरियर’ या सिनेमानंतर सर्वांच्या ओठांवर एकच नाव आहे, ते म्हणजे, या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत याचे. ओम राऊतच्या या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आणि या चित्रपटाने ओम राऊत या दिग्दर्शकाला नवी ओळख दिली. आज ओम राऊत या नावाची चर्चा असली तरी त्याचा जीवनप्रवास फार कमी लोकांना ठाऊक आहे.
ओमने आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवला आणि कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने नोकरी धरली. त्याची पहिलीच नोकरी ही जगप्रसिद्ध टळश् च्या १५१५ ब्रॉडवे इमारतीत ३९ व्या मजल्यावर होती. क्रिएटिव्ह रिसोर्स टीमचा तो एकमेव भारतीय सदस्य होता. पण नोकरीतले पहिले सहा महिने पुन्हा कसोटीचे होते. अमेरिकन जनतेला आवडेल असे त्याला लिहीताच येईना. पण हळूहळू जम बसला आणि त्याच्या कलेला अमेरिकन प्रेक्षकांची पावती मिळाली. बघता बघता 8 वर्षे गेलीत. एकदा ओम न्यूयॉर्क यांकीचा बेसबॉल सामना पाहायला गेला. सामना सुरू होण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रगीत सुरु झाले आणि त्या राष्ट्रगीताने ओमचे डोळे खाडकन् उघडले. होय, आपण या देशात परके आहोत, या भावनेने डोके वर काढले. ही भावना त्याला इतकी अस्वस्थ करून गेली की, पुढच्याच आठवड्यात त्याने भारतीय सिनेमा वितरक कंपनी युएफओचे संजय गायकवाड यांची भेट घेतली आणि त्यानंतर तो कायमचा भारतात परतला.
भारतात आल्या आल्या त्याला जाणवलं, ते म्हणजे आपल्या देशात स्वराज आहे पण सुराज्य नाही. याच जाणीवेतून त्याचा पहिला सिनेमा साकारला. या सिनेमाचे नाव होते, ‘लोकमान्य टिळक- एक युगपुरूष’. हा ओमचा पहिला सिनेमा. या सिनेमानंतर ओम राऊतची दुसरी कलाकृती म्हणजे, ‘तान्हाजी’.