कोणत्याही व्यक्तीचा व्यक्तीचा पहिला पगार हा कमीच असतो. पण बॉलिवूड कलाकारांना पहिला पगार इतका कमी होता यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे कलाकार तेव्हा स्टार झाले नव्हते. काहींना तर सिनेमासाठीही पहिलं मानधन इतकं कमी मिळालं होतं की, आता त्यांना त्यावर विश्वासही बसत नाही. आज आम्ही बॉलिवूडमधील ५ मोठ्या स्टार्सना पहिला पगार किती मिळाला होता हे सांगणार आहोत.
अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांना कलाकार व्हायचं होतं. पण कॉलेजनंतर त्यांच्यावर नोकरीचा दबाव होता. त्यामुळे त्यांनी कोलकातामधील शॉ वालेस या कंपनीत काम नोकरी केली होती. नंतर दुसऱ्या शिपींग कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. पहिल्या नोकरीचा पहिला पगार त्यांना ४८० रूपये मिळाला होता. आपल्या एका ब्लॉगमधून त्यांनी ही माहिती दिली होती. त्यांना सिनेमासाठी पहिलं मानधन हे ५ हजार रूपये मिळालं होतं. जे त्यांना सात हिंदुस्थानी सिनेमासाठी मिळालं होतं.
शाहरुख खान
शाहरूख खानने कधी नोकरी केली नाही. पण त्याने एकदा त्याच्या पहिल्या कमाईबाबत सांगितले होते. पंकज उदास यांच्या कॉन्सर्टमध्ये त्याला काम करण्यासाठी पन्नास रूपये मिळाले होते. या कॉन्सर्टमध्ये त्याला लोकांचं तिकीट चेक करणे आणि त्यांना त्यांची सीट दाखवणे हे काम होतं. या पैशातून आग्रा फिरायला गेला होता.
अक्षय कुमार
अक्षय कुमारला बॅंकॉकमध्ये आधी वेटरचं काम मिळालं होतं आणि नंतर शेफचं. इथे त्याला पहिला पगार १५०० रूपये मिळाला होता. नंतर हिरो बनण्याच भूत त्याच्या डोक्यात भरलं होतं. तो भारतात आला आणि फोटोग्राफर जय सेठसोबत काम केलं. स्ट्रगल करत असताना प्रमोद चक्रवर्तीसोबत त्याची भेट झाली. त्यानी अक्षय सोबत लगेच तीन सिनेमे साइन केले. सोबत तीन चेकही दिले. पहिल्या सिनेमासाठी ५ हजार रूपये, दुसऱ्या सिनेमासाठी ५० हजार रूपये आणि तिसऱ्या सिनेमासाठी १,५०,००० रूपये.
मनोज बाजपेयी
मनोज वाजपेयी हा सुरवातीला थिएटरमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. त्याची पहिली कमाई १२०० रूपये इतकी होती. त्यानंतर महेश भट्ट यांच्या एका मालिकेत त्याला रोल मिळाला होता. त्याचे त्याला महिन्याला १५०० रूपये मिळायचे.
धर्मेन्द्र
धर्मेंद्र हे पंजाबमधील एका गावात राहत होते. त्यांना हिरो बनायचं होतं. त्यांच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं ‘दिल भी तेरा हम भी तेरे’. या सिनेमात धर्मेंद्र यांच्यासोबत होते बलराज साहनी. हिरोईन होती कुमकुम. या सिनेमासाठी त्यांना ५१ रूपये मानधन मिळालं होतं. हा सिनेमा १९६० मध्ये रिलीज झाला होता.
हे पण वाचा :
जगातली सर्वात उंच इमारत असलेल्या 'बुर्ज खलीफा'मधे आहे 'या' 3 बॉलिवूड स्टार्सचं घर!
पहिल्या सिनेमात सलमान खानसोबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्रीला मिळाले नाही यश, टीचरसोबतचं केलं लग्न
समीरा रेड्डी म्हणाली - बॉलिवूडमधून मला 'सावळी' आणि 'उंच' म्हणून रिजेक्ट केलं जायचं!