Join us

जाणून घ्या, बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कंगना राणौतच्या ऑफिसमधले नक्की काय- काय तोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 6:44 PM

कंगना हिमाचलवरुन मुंबईत दाखल होण्याआधीच तिच्या ऑफिसचा एक मोठा भाग तोडण्यात आला. 

कंगना सध्या सिनेमांपेक्षा जास्त तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची  तुलना पीओकेशी केली होती. त्यानंतर  कंगना आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध रंगलं. वादा इतका विकोपाला गेला की आज बीएमसीने कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामांवर बुल्डोजर चालवला. कंगना हिमाचलवरुन मुंबईत दाखल होण्याआधीच तिच्या ऑफिसचा एक मोठा भाग तोडण्यात आला. 

जाणून घेऊया बीएमसीने कंगनाच्या ऑफिसमध्ये काय-काय तोडले

बीएमसीने कंगनाच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामांची नोंद केली, ती अशी आहे.

1) तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन तयार करण्यात आले) 2) तळमजल्यावरील स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर बेकायदेशीरपणे तयार केले गेले आहे.3) जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या पार्किंग लॉटमध्ये दोन अनधिकृत शौचालये बांधली4) जेवणासाठी तळमजल्यावर अनधिकृतपणे जागा तयार करण्यात आली. 5) पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे लाकडी पार्टिशन टाकून केबिन तयार करण्यात आली. 6) पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे शौचालय बांधले7) पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला8) दुसर्‍या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल9) बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली

कंगनाने ही मुंबईत दाखल होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तिच्या  ऑफिसमधील व्हिडीओ पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली टीका ''उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही बॉलिवूड माफियासोबत मिळून माझं घर उध्वस्त करून बदला घेतला आहेस. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचा हा अहंकार तुटेल. वेळ नेमही एकसारखी नसते. हे करून तुम्ही माझ्यावर उपकार केले.. काश्मीरी पंडितांवर काय संकट आलं असेल हे माहीत होतं, परंतु आज मी ते स्वतः अनुभवलं. आज मी देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्यावर नाही, तर काश्मीर पंडितांवरही चित्रपट तयार करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र,''असं कंगनानं ट्विट केलं. Kangana Ranaut critisized on Maharashtra CM Uddhav Thackeray

पालिकेच्या कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती कंगना राणौतच्या कार्यालयात मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं पालिकेला दिले आहेत. त्यामुळे कंगनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होण्याच्या काही वेळापूर्वीच पालिकेनं कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवली होती.

टॅग्स :कंगना राणौत