हिंदी चित्रपटसृष्टीचे मानाचं आणि प्रतिष्ठेचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य अभिनय क्षेत्राशी जोडला गेला आहे. महानायक बिग बी अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन सगळेच कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतात.घरातले सगळेच अभिनया क्षेत्रात काम करत असताना अमिताभ यांची मुलगी श्वेता मात्र अभिनयापासून लांबच राहिली.
महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. श्वेता फिल्मी दुनियेतपासून लांब असली तरीही श्वेता कायम चर्चेत असते. श्वेता ही अमिताभ व जया यांची मोठी मुलगी आहे. अनेकदा श्वेता बच्चनचे अभिनय न करण्यामागे नेमके काय कारण असावे याबाबत प्रश्नही पडत असावा.
फिल्मी बँकग्राऊंड असलेल्या कुटुंबातून असूनदेखील श्वेता बॉलिवूडपासून दूर राहिली, मात्र पेज थ्री पार्टीज आणि इव्हेंट्समध्ये ती नेहमी दिसत असते. रणबीर कपूरचा आतेभाऊ निखिल नंदासोबत 1997 मध्ये श्वेताचे लग्न जाले. तिला नव्या नवेली आणि अगस्त्य ही दोन मुले आहेत.
नेहमीच श्वेताला तिच्या अभिनयक्षेत्रात न येण्यामागे कारण विचारले जायचे. यावर श्वेताने एका मुलाखतीत सांगितले होते की, लहानपणी शाळेत असताना ती देखील नाटकात काम करायची. अभिनयाची तिलाही आवड होती. पण एकदा शाळेत नाटकात काम करत असताना तिला डायलॉगच आठवले नाही. ऐनवेळी नाटक सुरु असताना श्वेता डायलॉग विसरली आणि त्यामुळे तिचे सा-यांसमोर हसू झाले होते.
महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेताकडून मोठ्या अपेक्षा होत्या. धड दोन वाक्यही श्वेता लक्षात ठेवू शकली नाही अशी तिची खिल्लीही उडवली गेली होती. या घटनेमुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली. त्या दिवसापासून श्वेताने अभिनय क्षेत्र तिच्यासाठी नाही. कधीच अभिनय करणार नसल्याचाच तिने निर्णय घेतला.
त्या दिवसांपासून ती बॉलिवूडपासून दूर झाली. श्वेताने फॅशन डिझाइनिंगचे शिक्षण पूर्ण केले. फॅशन डिझायनर बनली.आज तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असून तिचा स्वतःचा एक क्लोदिंग ब्रँडही आहे.
श्वेताचा निखिली नंदासोबत घटस्फोट झाला आहे. तब्बल लग्नाच्या २२ वर्षानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. या घटस्फोटाचे नेमके कारण समोर आले नसले तरी हे दोघे सध्या वेगळे राहत आहेत. तसेच श्वेताने इस्टाग्रामवर देखील नंदा आडनाव काढत केवळ श्वेता बच्चन ठेवले आहे. आता दिल्ली सोडून श्वेताने थेट मुंबई गाठत आई-वडिलांसह राहते.