तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते. हे सिद्ध करून दाखवलंय कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांनी. बॉलीवुमध्ये विनोदाचा बादशाह म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 90च्या दशकात हिंदी सिनेमामध्ये जॉनी लिव्हर यांनी अभिनय आणि कॉमेडीने सर्व बॉलिवूड इंडस्ट्रीला हसून लोटपोट केले. सिनेमातील काही किस्से त्यांच्यासाठी वेगळ्या पध्दतीने लिहण्यात येऊ लागले होते. त्यांच्या पात्राचे नावसुध्दा रसिकांचे मनोरंजन करतील असेच ठेवण्यात येत होते.
कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर जॉनी लिव्हर आजही रसिकांचे मनोरंजन करतात. आयुष्यात कितीही चढउतार आले तरी ते डगमगले नाहीत. अन् अवघं जगं जिंकून घेतल्याप्रमाणे आजही साऱ्यांच्या मनजावर राज्य करतायेत. जेव्हा जेव्हा कॉमेडीचा विषय निघतो तेव्हा डोळ्यासमोर सर्वात आधी फक्त आणि फक्त जॉनी लिव्हरचा चेहरा डोळ्यासमोर येतो. स्टँडअप कॉमेडीला खरी ओळख जॉनी लिव्हरनेच मिळवून दिली आहे. जॉनी लिव्हरपासून प्रेरणा घेत अनेक कलाकार आज कॉमेडी करत आपले करिअर घडवत आहे.
घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे जॉनी यांनी लहान वयातच दोन पैसे कमावता यावे यासाठी काम करायला सुरुवात केली होती. रस्त्यावर पेनही त्यांनी विकले. संजीव कुमार, प्राण, अशोक कुमार, यासारखे दिग्गज कलाकार मंडळीदेखील त्यांची मिमिक्री पाहून पेन खरेदी करायचे. नंतर त्यांनी हिंदुस्तान लिव्हर कंपनीत नोकरी केली.
कंपनीच्या एका कार्यंक्रमात त्यांनी सगळ्यांची मिमिक्री केली. कार्यक्रमात उपस्थित असलेले वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी खुष होऊन म्हटले की, जॉनीने तर आपल्या कॉमेडी अंदाजाने सगळ्यांची बँड वाजवली. आज पासून तुझे नाव जॉनी लिव्हर .तेव्हापासून जॉनी यांच्या नवापुढे लिव्हर हे नाव जोडले गेले. त्यापूर्वी त्यांचे नाव जॉन प्रकाश राव जानुमाला होते.
कल्याणजी आनंदजी ह्यांच्या म्युजीकल शोमध्ये परफॉर्म करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. स्टेज शो ते रुपेरी पडदा त्यांनी गाजवला. १३ फिल्मफेअर अवॉर्ड त्यांनी मिळवले आहेत. आज जॉनी लिव्हर एकुण 227 कोटी संपत्तीचे मालक आहेत. महिन्याला १ कोटी रुपये इतके कमाई ते करतात. वर्षाला 12 कोटी रुपयांची ते कमाई ते करतात . सिनेमात काम करण्यासाठी १ कोटी रुपये मानधन घेत असल्याचे बोलले जाते.
मुंबईतल्या लोखंडवाला परिसरात आलीशान 3 बीएके फ्लॅटमध्ये कुटुंबासह ते राहतात.याव्यतिरिक्तही त्यांच्याकडे फ्लॅट आणि विला आहेत. आलिशान गाड्यांचेही खास कलेक्शन त्यांच्याकडे आहेत. Audi Q7, Honda Accord, Toyota fortuner यासारख्या महागड्या गाड्या त्यांच्याकडे आहेत. संघर्षातून वाट काढत आज कॉमेडीचा बादशाह जॉनी लीवर आलिशान आयुष्य जगत आहेत.