Join us

जाणून घ्या कोणते सेलिब्रिटी आहेत ‘अंधश्रद्धाळू’!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2017 6:37 AM

अबोली कुलकर्णी जगाचा विकास झपाट्याने होतोय. जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा विकास, आधुनिकता यांची परिसीमाही आपण गाठली आहे. ‘अब है दुनिया मुठ्ठी ...

अबोली कुलकर्णी जगाचा विकास झपाट्याने होतोय. जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा विकास, आधुनिकता यांची परिसीमाही आपण गाठली आहे. ‘अब है दुनिया मुठ्ठी मैं’ असे आपण सहजच म्हणतो. एवढे तंत्रज्ञान विकसित झालेले असतानाही अंधश्रद्धा मानणारे, कुप्रथा पाळणारे लोक आहेत काय? तर होय. केवळ तुम्ही-आम्हीच नाही तर आपण ज्या फिल्मी सिताऱ्यांचे चाहते आहोत ते अनेक सेलिब्रिटी अंधश्रद्धाळू असल्याचे दिसून आले आहे. विश्वास बसत नाही ना? मग पाहा कोणकोण आहेत हे स्टार्स जे अंधश्रद्धा मानतात. अमिताभ बच्चन  आज आपण ज्या मेगास्टार अमिताभ बच्चनला ओळखतो ते काही एका रात्रीतच स्टार झालेले नाहीत. त्यांच्याही आयुष्यात प्रचंड संघर्ष होता. खाचखळगे होते ज्यांना पार करून त्यांना पुढे जावे लागले. पण, त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांचा एकही चित्रपट हिट होत नव्हता. त्यावेळी ते एका ज्योतिषाकडे गेले. तेव्हा त्या ज्योतिषाने बिग बींना निळ्या रंगाचा खडा अंगठीच्या रूपात हातात घालायला सांगितला. त्यानंतर त्यांच्या नशीबाने एकदम उडी घेतली. एकंदरित काय, ते देखील अंधश्रद्धा मानतात, हे यावरून कळते.शाहरूख खानअंधश्रद्धा मानण्यात बॉलिवूडचा किंग खानही मागे नाही. त्याचा ५५५ या अंकांवर खुप विश्वास आहे. त्याला वाटते की, हे आकडे त्याचे नशीब पालटवू शकतात. त्यामुळे त्याला त्याच्या कारच्या नंबर प्लेटसह बाईकच्याही नंबर प्लेटवर ५५५ असे असलेले आवडते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘चैन्नई एक्सप्रेस’ चित्रपटाच्या पोस्टरवर तो ज्या बाईकवर बसला आहे त्याचा नंबरही ५५५ असतो.सलमान खानबॉलिवूडचा सुल्तान सलमान खान याच्याबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचे वडील सलीम खान यांनी त्याला गिफ्ट दिलेले निळ्या रंगाचे ब्रेसलेट कधीही त्याच्यापासून दूर करत नाही. तो त्या ब्रेसलेटला स्वत:साठी लकी मानतो.आमिर खान बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा देखील अंधश्रद्धेच्या बाबतीत मागे नाही. तो असे मानतो की, डिसेंबर किंवा ख्रिसमसच्या दरम्यान जर त्याचे चित्रपट रिलीज झाले तर ते चित्रपट हिट होतील. याअगोदर ‘तारे जमीन पर’, ‘गझनी’,‘३ इडियट्स’,‘धूम ३’,‘पीके’ यासारखे डिसेंबर मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर प्रचंड गल्ला जमवल्याचे समजते. सैफ अली खान‘तैमूर’चा वडील नवाब सैफ अली खान याला ७ हा अंक त्याच्यासाठी लकी वाटतो. तारखांबाबतीतील त्याची श्रद्धा ही खरी आहे. तो आजही चित्रपट रिलीज करायचा असेल तर ७ तारखेला प्राधान्य देतो. हृतिक रोशन ‘बॉलिवूडचा ग्रीक गॉड’ हृतिक रोशन याच्या हाताला सहा बोटे आहेत. अनेकदा त्याने त्याचे सहावे बोट कापून टाकण्याचा प्रयत्न केला. पण, आता मात्र तो त्या त्याच्या सहाव्या बोटालाच स्वत:साठी लकी मानतो आहे. रणबीर कपूर बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर हा त्याची आई नीतू कपूर हिला स्वत:चा लकी चार्म मानतो. नीतू कपूरची वाढदिवसाची तारीख ८ जुलै असून रणबीरने त्याच्या कारचा नंबरही ८ असाच ठेवला आहे. त्याच्या आयुष्यातही नीतू कपूरच्या मताला खुप महत्त्व आहे.