जाणून घ्या, कोण आहेत बॉलिवूडचे अॅडव्हेंचरप्रेमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 6:46 AM
अबोली कुलकर्णीफिल्मी पडद्यावर मारामारी, अॅक्शन, स्टंटबाजी, थ्रिल पाहिल्याशिवाय आपल्याला तो चित्रपट पाहिल्यासारखाच वाटत नाही. ‘पैसावसूल’ चित्रपटांची व्याख्याच आपण ...
अबोली कुलकर्णीफिल्मी पडद्यावर मारामारी, अॅक्शन, स्टंटबाजी, थ्रिल पाहिल्याशिवाय आपल्याला तो चित्रपट पाहिल्यासारखाच वाटत नाही. ‘पैसावसूल’ चित्रपटांची व्याख्याच आपण तशी केलेली असते. रोमँटिक सीन्ससोबतच आपल्याला पडद्यावर एक डेअरिंगबाज हिरो किंवा हिरोईन बघायला मनापासून आवडत असते. नाही का? आता तुम्ही म्हणाल हे तर खरं आहे पण त्याचे इथे काय? तर होय, पडद्यावर तर हे कलाकार पैशांसाठी कुठलीही स्टंटबाजी करायला तयार होतात. मात्र, रिअल लाईफमध्ये यांना खरंच अॅडव्हेंचर करायला आवडते काय? तर हो. बॉलिवूडमध्ये काही कलाकार असेही आहेत ज्यांना रिअल लाईफमध्येही अॅडव्हेंचर करायला मनापासून आवडते. घेऊयात मग अशाच काही कलाकारांचा आढावा.... अक्षय कुमारस्टंटबाजी, अॅक्शन म्हटल्यावर बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारचे नाव तोंडी आले नाही तरच नवल. त्याने बॉलिवूडमध्ये अनेक अॅक्शनपट साकारले. अॅक्शन हिरो म्हणून त्याने नावलौकिक कमावला. त्याला केवळ पडद्यावरच नव्हे तर रिअल लाईफमध्ये देखील स्टंट, अॅडव्हेंचर करायला प्रचंड आवडते. वेगवेगळया शोजमध्येही तो सहभागी होत असतो. निसर्गाच्या जवळ जाऊन काहीतरी उपक्रम करायलाही त्याला आवडते. प्रियांका चोप्राबॉलिवूडची देसी गर्लने आता देशातच नव्हे तर परदेशातही तिचे नाव उंच केले आहे. ती आता इंटरनॅशनल सेन्सेशन बनली आहे. खरंतर तिचा प्रवास काही सोपा नव्हता. पण, तिने तिच्यातील लढाऊ वृत्तीला कायम प्रोत्साहितच ठेवले. त्यामुळे तिला हा प्रवास सुकर आणि सुलभ झाला. पीसीलाही तिच्या वैयक्तिक आयुष्यात अॅडव्हेंचर करायला प्रचंड आवडते. रोहित शेट्टीपडद्यावर मारधाड, अॅक्शन, मारामारी आणि गाड्यांची एकमेकांसोबत टक्कर असे काहीसे सीन म्हटल्यावर दिग्दर्शक रोहित शेट्टीच आठवतो. त्याने ‘अॅक्शन डायरेक्टर’ म्हणून इंडस्ट्रीत नाव कमावले आहे. गोलमाल सीरिज तसेच सिंघम अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने अॅक्शन सीन्ससोबतच कॉमेडी साकारून गल्ला जमवला. रोहितला व्यक्तिगत आयुष्यातही असे अॅक्शन, मारामारी, अॅडव्हेंचर करायलाही खूप आवडते. अनेकदा तो स्टंट सीन्सवर आधारित असलेल्या रिअॅलिटी शोमध्येही दिसला आहे. अर्जुन कपूर‘२ स्टेटस’ मधील रोमँटिक क्रिश आणि गुंडे मधला ‘बाला’ हे दोघेही एकमेकांपेक्षा किती वेगळे आहेत. नाही का? अर्थात त्यांच्यात एकच फरक आहे तो म्हणजे त्यांच्यातील गुंडागिरीचा. कारण बाला हा कायम गुंडागिरी, स्टंट, मारामारी करणारा आणि क्रिशचा तर या सगळयांशी काहीही संबंध नाही. मात्र, रिअल लाईफ मधील अर्जुन कपूरमध्ये बालाच पूर्णपणे सामावलेला आहे. त्याला अॅडव्हेंचर खूप आवडते.