माधुरी दीक्षितची डुप्लिकेट म्हणून प्रसिद्ध होती ही अभिनेत्री, कित्येक वर्षापासून सिनेसृष्टीमधून आहे गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 03:39 PM2021-12-31T15:39:27+5:302021-12-31T15:41:20+5:30

नव्वदच्या दशकात रुपेरी पडद्यावर एक अभिनेत्री झळकली होती. या अभिनेत्रीबाबत तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. मात्र हिची खास ओळख म्हणजे ती धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिची डुप्लिकेट होती.

Know why Actress Niki Aneja Walia is away from cine industry & reason behind this is Madhuri Dixit, check Details here | माधुरी दीक्षितची डुप्लिकेट म्हणून प्रसिद्ध होती ही अभिनेत्री, कित्येक वर्षापासून सिनेसृष्टीमधून आहे गायब

माधुरी दीक्षितची डुप्लिकेट म्हणून प्रसिद्ध होती ही अभिनेत्री, कित्येक वर्षापासून सिनेसृष्टीमधून आहे गायब

googlenewsNext

जगात सेम टू सेम दिसणार्‍या सात व्यक्ती असतात असं म्हटलं जातं. सेलिब्रिटींचे तर अनेक डुप्लिकेट आपण पाहिले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख, अनिल कपूर, देवानंद अशा एक ना अनेक गाजलेल्या कलाकारांचे सेम टू सेम भासावे असे डुप्लिकेट आहेत. नव्वदच्या दशकात रुपेरी पडद्यावर एक अभिनेत्री झळकली होती. त्या अभिनेत्रीचं नाव होतं निक्की अनेजा. या अभिनेत्रीबाबत तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. मात्र हिची खास ओळख म्हणजे ती धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिची डुप्लिकेट होती. बर्‍याच वर्षानंतर निक्की पुन्हा एकदा अभिनयाकडे वळली होती. लवकरच अभिनेता संजय कपूरसह( Sanjay Kapoor) इश्क गुनाह या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते. 'मिस्टर आजाद' या सिनेमातून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात करणार्‍या  निक्कीला (Niki Aneja Walia)बॉलीवुडला रामराम का करावा लागला याचा खुलासा खुद्द तिनेच केला होतो. 

1992च्या दरम्यान कॉलेजमध्ये असताना निक्कीने मॉडेलिंगमध्ये हात आजमावले. यावेळी तिने अनेकांची मनं जिंकली त्यामुळेच की काय दुसर्‍या  क्रमांकाचा अवॉर्ड मिळाला होता. मात्र निक्कीचं पायलट बनण्याचं स्वप्न होतं. तिनं त्यासाठी 72 तासांची एक टेस्टही दिली होती. मात्र वडिलांनी यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने निक्कीने पायलट बनण्याचं स्वप्न अर्धवट सोडून दिलं. यानंतर भावानं केलेल्या मार्गदर्शनामुळे तिने आपला पहिला पोर्टफोलिओ बनवला. यानंतर निक्कीचं नशीब जणू काही पालटलं. तिचा पोर्टफोलिओ पाहून तिला जाहिरातीच्या विविध ऑफर्स येऊ लागल्या. तिची पहिली कमाई 8 हजार रुपये होती. 

जाहिरात, मॉडेलिंगबद्दल निक्कीच्या मनात विशेष आवड निर्माण झाली. मात्र यांत करियर करण्याच्या इच्छेला तिलांजली देत निक्की पुन्हा वडिलांकडे आली. वडिलांकडे आग्रह करुन तिने सिनेमात काम करण्याची परवानगी मिळवली. 'मिस्टर आजाद' या पहिल्याच सिनेमातील तिच्या कामाचं कौतुकही झालं. मात्र त्याचवेळी ती माधुरीची डुप्लिकेट असल्याचा शिक्काही तिच्यावर बसला. निकी माधुरी इतकीच सुंदर दिसते सोशल मीडियावर तिचे एक से बढकर एक फोटो पाहायला मिळतात.

Web Title: Know why Actress Niki Aneja Walia is away from cine industry & reason behind this is Madhuri Dixit, check Details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.