Join us

जेव्हा २०० रु रोजंदारीवर काम करणारे धर्मेद्र यांनी अमेरिकेला जाण्याची ऑफर धुडकावून लावली, कारण वाचून वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 7:30 PM

1970 च्या दशकात धर्मेंद्र जगातील सर्वात देखण्या आभिनेतापैकी एक होते. धर्मेंद्र यांना वर्ल्ड आयर्न मॅन अवॉर्डही देण्यात आला आहे.

आपल्या अभिनयाने ८०च्या दशकात एकाहून एक सरस चित्रपट देणारे आणि आजतागायत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेता म्हणजे धर्मेंद्र. कुणी त्यांना बॉलीवूडचे हिमॅन म्हणतं तर कुणी वीरू रसिकांनी धरमपाजींवर कायमच प्रेम केलं आहे.

आजही धर्मेंद्र यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. धरमपाजीं सोशल मीडियावर सक्रीय असून तिथंही त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या फिल्मी करिअरप्रमाणे खासगी आयुष्यही तितकेच गाजले. त्यांच्या आयुष्यातले अनेक किस्से आजही तितकीच चर्चेत असतात. असाच एक किस्सा चर्चेत आला आहे. 

'दिल भी तुम्हारा' सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 1970 च्या दशकात धर्मेंद्र जगातील सर्वात देखण्या आभिनेतापैकी एक होते. धर्मेंद्र यांना वर्ल्ड आयर्न मॅन अवॉर्डही देण्यात आला आहे. धर्मेंद्रच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये 'सत्यकाम', 'खामोशी', 'शोले', 'क्रोधी' आणि 'यादों की बरात' यांचा समावेश आहे.

धर्मेंद्र यांनाही स्ट्रगल काही चुकले नाही. अभिनय क्षेत्रात येण्याआधी त्यांनाही प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. घर चालवण्यासाठी मिळेल ते कामं धर्मेंद्र यांनीही केली. धर्मेंद्र यांनी गॅरेजमध्येही दिवस काढावे लागले होते. पंजाबमधून मुंबईत आलेल्या धर्मेंंद्र यांच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते. त्यामुळे गॅरेजमध्येच राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. त्यावेळी धर्मेंद्र यांना अमेरिकन ड्रिलिंग कंपनीत नोकरी लागली होती.

या नोकरीतून त्यांना दिवसाला केवळ  २०० रु मिळायचे. याच कंपनीकडून धर्मेंद्र यांना अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली होती. कामानिमित्त कंपनीने धर्मेंद्र यांना अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. पण धर्मेंद्र यांनी अमेरिकेला जाण्याची ऑफर स्विकारली नाही. त्यांना मुंबईत राहूनच अभिनय क्षेत्रात काम करायचे होते.त्यामुळे अमेरिकेला जाण्याची मिळालेली ऑफर त्यांनी धुडकावून लावली होती. 

 सनी देओल आणि बॉबी देओल या दोन्ही मुलांनी अभिनय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत धर्मेंद्र यांची तिसरी पिढीसुद्धा बॉलिवूडमध्येच आपले नशीब आजमवत आहे.

टॅग्स :धमेंद्रसनी देओल