Join us

  इतक्या वर्षांनंतर अचानक का संतापली कोएना मित्रा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 16:14 IST

अभिनेत्री कोएना मित्राने बॉलिवूडला कधीच रामराम ठोकलाय. पण सध्या एका गोष्टीमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

ठळक मुद्दे ‘ओ साकी साकी’चे नवे व्हर्जन सिंगर नेहा कक्करच्या आवाजात रिक्रिएट करण्यात आले आहे.

अभिनेत्री कोएना मित्राने बॉलिवूडला कधीच रामराम ठोकलाय. पण सध्या एका गोष्टीमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, एका गाण्यामुळे ती भडकली. आता ही काय भानगड आहे, हे तर कळायलाच हवे.सध्या बॉलिवूडमध्ये जुनी गाणी रिक्रिएट करण्याचा नवा ट्रेंड सुरु आहे, हे तर तुम्ही जाणताच. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोएनाही यामुळेच भडकली.

गतवर्षी ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात ‘दिलबर दिलबर’ हे गाणे रिक्रिएट केले होते. यात नोरा फतेही दिसली होती. हे गाणे सुपरडुपर हिट झाले होते. यावर्षी येऊ घातलेल्या ‘बाटला हाऊस’ या चित्रपटातही नोरा ‘ओ साकी साकी’ हे गाणे रिक्रिएट करणार आहे. काही दिवसांपूर्वी या गाण्याचा टीजर रिलीज करण्यात आला.

 

हा टीजर पाहून ‘ओ साकी साकी’ या ओरिजनल गाण्याची हिरोईन कोएना मित्रा जाम संतापली. ट्विटरवर तिने आपला हा संताप बोलून दाखवला.

‘साकी साकी हे गाणे पुन्हा रिक्रिएट करण्यात येणार आहे. हे गाणे सुनिधी, सुखविंदर, विशाल-शेखर यांनी बनवले होते. मला या गाण्याचे रिक्रिएट व्हर्जन अजिबात आवडलेले नाही. या गाण्याचा नुसता विचका करून ठेवलाय. हे गाणे ब्लॉकबस्टर गाणे होते. बटला हाऊस या चित्रपटात ते का घ्यावे?,’असे कोएनाने म्हटले आहे. अर्थात तिने नोराची प्रशंसा केली आहे. नोरा उत्तम आहे. आशा करते, ती आम्हाला अभिमान वाटावा असे काम करेल, असे कोएनाने लिहिले.‘ओ साकी साकी’चे नवे व्हर्जन सिंगर नेहा कक्करच्या आवाजात रिक्रिएट करण्यात आले आहे.

टॅग्स :नोरा फतेही