बॉलिवूडमध्येही माझ्या नवऱ्याची बायको, कारण भूमी पेडणेकर आहे 'या' अभिनेत्रीच्या नवऱ्यावर फिदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 11:25 AM2019-01-29T11:25:20+5:302019-01-29T11:32:31+5:30
भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव करण जोहरच्या कॉफी विद करणमध्ये आले होते. यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डायरेक्टर असतानाचा भूमीने दिशा पटानीला ऑडिशनमध्ये फेले केल्याचा खुलासा केला
भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव करण जोहरच्या कॉफी विद करणमध्ये आले होते. यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डायरेक्टर असतानाचा भूमीने दिशा पटानीला ऑडिशनमध्ये फेले केल्याचा खुलासा केला. भूमीने कॉफी विद करणमध्ये प्रियांका चोप्राचा पती निकला डेट करण्याची इच्छा बोलवून दाखवली. निकवर तिचे क्रश असल्याची कबुली भूमीने दिली. 'लहानपणापासूनच मी निकची गाणी ऐकत आलंय. तेव्हापासून माझे त्याच्यावर क्रश आहे', असे भूमीने सांगितले.
गतवर्षी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी जोधपूरच्या उमेद भवन येथे ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. नुकतेच प्रियांकाच्या सासू सासऱ्यांनी तिच्यासाठी एका खास वेलकम पार्टी ठेवली होती. या वेलकम पार्टीचे फोटो व व्हिडिओ सध्या इंटरेटवर धूम करत आहेत.
लग्नानंतर प्रियांका व निक दोघेही स्वित्झर्लंड व कॅरेबियन देशात हनीमूलला गेले होते. यादरम्यानचे अनेक फोटो प्रियांकाने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले होते. प्रियांकाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूड चित्रपट रिलीज होतोय. याशिवाय ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटातून तू बॉलिवूडमध्ये वापसी करतेय. या चित्रपटात ती फरहान अख्तरसोबत दिसणार आहे. जायमा वसीमही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटाचे काही शूटींग शिल्लक आहे. या शूटींगसाठी प्रियांका लवकरच भारतात येणार असल्याचे कळतेय.