अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरच्या प्रेमात वेडी झालीय. तूर्तास संपूर्ण इंडस्ट्रीत सर्वत्र मलायका व अर्जुन यांच्याच प्रेमाच्या चर्चा आहेत. हे कथित कपल लवकरचं लग्न करणार, असेही मानले जात आहे. अलीकडे ‘कॉफी विद करण 6’च्या सेटवर आमिर खानसोबत काही काळ मलायका अरोरा ही सुद्धा दिसली आणि तिच्या व अर्जुनच्या लग्नाच्या चर्चेला आणखी जोर चढला. यादरम्यान मलायकाला गमतीने छेडतांना करण जोहर ‘इशारों इशारों मे’ बरेच काही बोलून गेला. मलायका व अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत त्याने दिले. ‘हम सभी नीचे की ओ जा रहे हैं, और ये आपकी जिंदगी में भी जल्द होने वाला है,’ असे करण मलायकाला गमतीने छेडताना म्हणाला. त्याचा इशारा मलायका व अर्जुनच्या लग्नाकडे होता. करणचे हे शब्द ऐकून मलायका चांगलीच लाजली आणि करणला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. ‘प्लीज रूको, अभी रूको,’असे म्हणत मलायकाने करणला शांत करण्याचे प्रयत्न केला.अर्जुन कपूर हा मलायकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. गेल्या काही दिवसांत मलायका आणि अर्जुन दोघेही खुल्लमखुल्ला एकत्र फिरतांना दिसत आहेत. मलायकाने आपला वाढदिवस खास अर्जुनसोबत साजरा केला होता. अगदी अलीकडे ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’च्या मंचावरही दोघांची केमिस्ट्री दिसली. त्यापूर्वी लॅक्मे फॅशन वीकमध्येही हे कपल एकत्र दिसले. आता ताजी बातमी खरी मानाल तर मलायका व अर्जुन दोघेही पुढील वर्षी लग्नबंधनात अडकू . होय, एका सूत्राच्या हवाल्याने फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, मलायका व अर्जुन दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत. दोघेही आपल्या नात्यशकतातावर सध्या मौन बाळगून आहेत. पण एकमेकांसोबत ते अतिशय आनंदी आहे आणि पुढील लग्न करण्याचा निर्णय दोघांनीही घेतला आहे.
मलायका अरोरा व अर्जुन कपूर लवकरच करणार लग्न! करण जोहरने दिले असे काही संकेत!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 9:45 AM