दोन अभिनेत्रींमधले वाद बॉलिवूडला काही नवीन नाहीत. अनेक अभिनेत्रींमध्ये आतल्याआत कोल्ड वॉर सुरु असतात. नुकतेच दीपिका पादुकोणच्या लग्नात कॅटरिना कैफने हजेरी लावून दोघांमधला अनेक वर्षांचा वाद संपवण्याचा प्रयत्न केला आहे. आता आणखी एक जोडी आपल्यातले वाद विसरुन करणच्या शोमध्ये एकत्र येणार आहे. आम्ही बोलतोय ते करीना कपूर आणि प्रियांका चोप्राबद्दल. 2004 मध्ये दोघींनी ऐतराजमध्ये एकत्र काम केले होते. दोघींमध्ये वादाची ठिणगी करणच्या 'कॉफी विथ करण'मध्ये पडली होती.
याशोमध्ये दोघी एकत्र आल्या होत्या. करिनाने प्रियांकाच्या इंग्लिश एक्सेंटवर खिल्ली उडवत ती हे इंग्लिस एक्सेंट कुठून शिकली अशी शेरबाजी केली होती. ही गोष्ट प्रियांकाच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. प्रियांकाने ही गप्प न बसता तुझा नवरा (सैफ अली खान) जिथून शिकला तिथूच शिकले. यानंतर दोघींमधली मैत्री दुश्मनीत बदलली.
कॉफी विथ करणच्या निमित्ताने या दोघी पुन्हा एकदा एकत्र येणार. करणच्या सहाव्या सिझनच्या शेवटचा भागाचे हॅप्पी एंडिंग करायला दोघे एकत्र येणार आहेत. करण जोहरने दोघींसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये दोघी स्टायलिश अंदाजात दिसतायेत.
प्रियांका लग्नानंतर पहिल्यांदाच कोणत्या चॅट शोमध्ये येणार आहे त्यामुळे शो दरम्यान प्रियांका लग्नाच्या अनेक गोष्टी करेल अशी आशा आहे. तर करीना तैमूरच्या लोकप्रियतेबाबतचे किस्से सांगणार आहे. या दोघींना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही.