Join us

Koffee With Karan 7 : एकाचवेळी दोघांना डेट करत होती अनन्या पांडे, आईनेच केली पोलखोल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 3:02 PM

Koffee With Karan 7 : होय, भावना पांडेने लेक अनन्या पांडेबद्दल (Ananya Panday) असा काही खुलासा केला की तो ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

चंकी पांडेची पत्नी भावना पांडे (Bhavana Pandey), संजय कपूरची पत्नी महिम कपूर आणि शाहरूख खानची पत्नी गौरी खान या तिघींनी नुकतीच ‘कॉफी विद करण 7’मध्ये  (Kofee With Karan 7) हजेरी लावली. या चॅट शोमध्ये गौरी खानने केलेले खुलासे तुम्हाला ठाऊक आहेतच. आता जरा चंकी पांडेच्या बायकोने केलेले खुलासे वाचून तुम्ही हैराण व्हाल. होय, भावना पांडेने लेक अनन्या पांडेबद्दल (Ananya Panday) असा काही खुलासा केला की तो ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

रॅपिड फायर राऊंडमध्ये करणने गौरी खानने सुहानाबद्दल प्रश्न केला. सुहानाला डेटिंगबद्दल काय सल्ला देशील? असं करणने गौरीला विचारलं. यावर, एकाचवेळी दोघांना डेट करू नकोस, इतकंच मी तिला सांगेल, असं उत्तर गौरीने दिलं. यावर  माझ्या मते, अनन्याने आधीच असं काही  केलं आहे? असं करण भावना पांडेकडे पाहत म्हणाला. करणचं हे वाक्य ऐकून भावनाला आश्चर्याचा धक्का बसला. काय अनन्याने? असं ती म्हणाली. यावर, हो, माझ्या माहितीनुसार, ती दोघांमध्ये फसली होती, असं करण म्हणाला. यावर, ‘नाही, ती दोघांबद्दल विचार करत होती. त्यामुळे तिने दोघांपैकी एकाशी ब्रेकअप केलं,’ असं भावना म्हणाली.काही दिवसांआधी अनन्या करणच्या याच शोमध्ये आली होती. यावेळी ती डेटिंगबद्दल बोलली होती. तू ईशानला डेट करत असतानाच विजय देवरकोंडासोबतही डेटवर गेली होतीस? असा थेट प्रश्नच करणने अनन्याला केला होता. यावर, विजय व माझी फ्रेंडली डेट होती, असं अनन्या म्हणाली होती.

मी सिंगल आहे, असा खुलासाही अनन्यायाने यावेळी केला होता. यावर, म्हणजे तू ईशान खट्टरसोबत ब्रेकअप केलंस? असा प्रश्न करणने केला होता. यावर अनन्याने त्याचं ऐकल्या न ऐकल्यासाखं केलं होतं. तू सध्या कार्तिक आर्यनला डेट करत आहेस का? या करणच्या प्रश्नावर, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असं अनन्या म्हणाली होती. आदित्य रॉयही मला हॉट वाटतो, असंही ती म्हणाली होती. 

टॅग्स :अनन्या पांडेकरण जोहरकॉफी विथ करण 6