करण जोहरचा ‘कॉफी विद करण 7’ (Koffee With Karan 7) हा चॅट शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. आता या शोच्या नव्या एपिसोडमध्ये शाहरूख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी खान (Gauri Khan), संजय कपूरची पत्नी महीप कपूर (Maheep Kapoor), चंकी पांडेची पत्नी भावना पांडे (Bhavana Pandey) हजेरी लावणार आहेत. शोचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे आणि या प्रोमोत गौरी खानने केलेला एक खुलासा ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. होय, सगळं काही ठीक आहे, पण शाहरूखच्या एका सवयीला गौरी खान वैतागली आहे.
प्रोमोमध्ये करण जोहर गौरीला अनेक प्रश्न विचारते. सुहाना खानला कोणत्या डेटींग टीप्स देते? तुझ्या व शाहरूखच्या लव्हस्टोरीला कोणत्या चित्रपटाचं नाव देशील? असे अनेक प्रश्न करणने गौरीला विचारले. गप्पांच्या ओघात शाहरूखची एक सवय मला अजिबात आवडत नाही, असं गौरी बोलून गेली.
शोमध्ये महिम, भावना, करण सगळेच शाहरूखबद्दल भरभरून बोलले. शहरूख खान जेंटलमॅन आहे. ऑन स्क्रीनचं नाही तर ऑफ स्क्रिनही, असं सर्व म्हणाले. शाहरूख एक परफेक्ट होस्ट आहे. तो पाहुण्यांना गाडीपर्यंत सोडायला येतो, असं करण म्हणाला. यावर गौरी तडक बोलायला लागली. ‘हो, पण त्याची हीच सवय मला आवडत नाही. घरी पार्टी असली की तो प्रत्येक गेस्टला बाहेरपर्यंत सोडायला जातो. गेस्ट गाडीत बसून निघून जात नाही, तोपर्यंत तो तिथेच असतो. त्याची ही सवय मला अनेकदा नाराज करते. पार्टी मन्नतच्या आत नसून बाहेर आहे, असं मला वाटतं. लोक पार्टीत त्याला शोधत असतात आणि हा बाहेर लोकांना निरोप देत असतो. अनेकदा तो पार्टीमध्ये कमी आणि बाहेरच जास्त वेळ घालवतो. त्यामुळे त्याला अनेकदा शोधावं लागतं,’असं गौरी म्हणाली.
लेक सुहानाला डेटींगबद्दल काय सल्ला देशील? असा प्रश्न करणने केल्यावर, ‘कधीच एकावेळी दोघांना डेट करू नकोस, असं मी तिला सांगेल,’ असं गौरी म्हणाली.तुझ्या आणि शाहरुखच्या लव्ह स्टोरीला साजेसं चित्रपटाचं नाव करणने विचारताच तिने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाचं नाव घेतलं.