Join us

Koffee With Karan 7: 'लायगर' फेम विजय देवरकोंडा करण जोहरवर झाला नाराज?, समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 4:05 PM

Koffee With Karan 7: बॉलिवूड इंडस्ट्रीत कधी, कोण, कोणावर रागावतो, हेच कळत नाही. 'लायगर' स्टार विजय देवरकोंडा बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहेत.

बॉलिवूड इंडस्ट्रीत कधी, कोण, कोणावर रागावतो, हेच कळत नाही. 'लायगर' स्टार विजय देवरकोंडा बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहेत. नुकतेच विजय आणि अनन्या पांडे 'कॉफी विथ करण ७'(Koffee With Karan 7)च्या एपिसोडमध्ये सहभागी झाले होते. या एपिसोडमध्ये विजय देवरकोंडा(Vijay Devarkonda)ला 'चीज'वाली कमेंट आवडली नाही, त्यानंतर तो करण जोहर(Karan Johar)वर चिडला.

अलीकडेच, पापाराझींनी विजय देवरकोंडा यांना 'चीज'वाल्या कमेंटची आठवण करून दिली, ज्यानंतर विजय फारसा आनंदी दिसला नाही. उलट त्याचा मूड खराब दिसत होता. करण जोहरच्या एपिसोडमध्ये सारा अली खानला विचारण्यात आले की तिला कोणाला डेट करायचे आहे, त्यावर तिने विजय देवराकोंडा हे नाव घेतले. यावर करण जोहरने जान्हवी कपूरला विचारले की तिला विजय आवडतो का? जान्हवी आणि सारा या दोघींनी मिळून विजयला 'चीज' म्हटले. जेव्हा करणने अनन्याला त्याच्या एका एपिसोडमध्ये हे सांगितले आणि विजयला त्यावर प्रतिक्रिया देण्यास सांगितले, तेव्हा अनन्याने विचारले की ती देखील या 'चीज' प्लेटर असू शकते का?

बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार विजय देवरकोंडा 'चीज' कमेंटमुळे खूश नाही, हा दावा खोटा आहे. सूत्राने सांगितले की, अभिनेता आनंदी आहे, या एपिसोडसाठी किंवा चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी त्याच्याकडे सर्व लक्ष वेधले जात आहे. तो करण जोहरचाही आभारी आहे. ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत, त्या पूर्णपणे निराधार आहेत. करण जोहर, विजयचा एक मार्गदर्शक आहे आणि तो नेहमीच त्याचे आभार मानतो. लायगरमुळे, करण जोहरने विजय देवरकोंडा यांना हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात खूप मदत केली आहे.

विजय देवरकोंडा, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे खूप चांगले मित्र आहेत. तिन्ही अभिनेत्री विजयला खूप मानतात. आजकाल विजय फक्त 'लायगर' चित्रपटाच्या प्रमोशनवर लक्ष केंद्रित करत आहे. विजय देवरकोंडाचा हा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात विजय अनन्या पांडेसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

टॅग्स :करण जोहरविजय देवरकोंडाअनन्या पांडे