Join us

Koffee With Karan 7:  ‘या’ दोन भावांना सारा अली खान व जान्हवी कपूरने केलं डेट, करणच्या शोमध्ये झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 2:02 PM

Koffee With Karan 7 : ‘कॉफी विद करण 7’च्या गुरूवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये सारा व जान्हवी कपूर दोघी सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान दोघींनी आपल्या लव्ह व सेक्स लाईफबद्दल अनेक खुलासे केलेत...

कार्तिक आर्यन ( Kartik Aaryan ) व सारा अली खान (Sara Ali Khan ) यांच्या अफेअरची कधीकाळी जोरदार चर्चा होती. सारा व कार्तिक या दोघांपैकी कोणीही यावर बोललं नाही. पण आता सुमारे दोन वर्षानंतर दोघांत अफेअर होतं, हे स्पष्ट झालं आहे. ‘कॉफी विद करण 7’च्या (Koffee With Karan 7) गुरूवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये खुद्द साराने ही गोष्ट कन्फर्म केली.

या एपिसोडमध्ये सारा व जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor) दोघी सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान दोघींनी आपल्या लव्ह व सेक्स लाईफबद्दल अनेक खुलासे केलेत. गप्पा गप्पांमध्ये करणने कार्तिक आर्यनचं नाव घेत, साराच्या लव्ह लाईफचा उल्लेख केला आहे आणि साराने त्यास दुजोरा दिला. इतकंच नाही, सारा व जान्हवीने दोन भावांना डेट करत होत्या, याचा खुलासाही यावेळी झाला.

साराने दिला दुजोरासारा अली खान व कार्तिक आर्यनच्या लव्हस्टोरीची सुरूवात ‘कॉफी विद करण 6’पासून झाली होती. होय, या शोमध्ये रॅपिड फायर राऊंडम्ये करणने साराला तू कुणाला डेट करू इच्छितेस? असा प्रश्न केला होता. यावर कार्तिक आर्यन असं उत्तर साराने दिलं होतं. यानंतर सारा व कार्तिक ‘लव्ह आज कल 2’मध्ये दिसले आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. अर्थात दोघांनीही कधीच पब्लिकली याची कबुली दिली नव्हती. पण कालच्या ‘कॉफी विद करण 7’च्या एपिसोडमध्ये सारा यावर बोलली. ‘कॉफी विद करण 7’च्या कालच्या एपिसोडमध्ये करणने साराला थेट प्रश्न केला. गेल्यावेळी तू शोमध्ये आली होतीस तेव्हा तू कार्तिक आर्यनला डेट करू इच्छितेस असं म्हणाली होती आणि असंच झालं सुद्धा..., असं करण म्हणाला. यावर, हो असं उत्तर साराने दिलं. 

सारा व जान्हवीने केलं दोन भावांना डेटजान्हवी कपूर व सारा अली खान दोघीही बेस्ट फ्रेंड्स आहेत. या दोघी एकेकाळी दोन भावांना डेट करत होत्या. ‘कॉफी विद करण 7’ खुद्द करणने याचा खुलासा केला. आता हे दोन भाऊ कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर चर्चा खरी मानाल तर ते पहारिया ब्रदर्स होते.

जान्हवी शिखर पहारियाला डेट करत होती तर सारा वीर पहारियाला डेट करत होती. वीर व शिखर हे दोघे एका मोठ्या राजकीय कुटुंबाशी संबंधित आहेत. सध्या सोशल मीडियावर जान्हवी व साराचे पहारिया ब्रदर्ससोबतचे अनेक फोटो व्हायरल होत आहे.

  आईमुळे झालं सारा व कार्तिकचं ब्रेकअप?सारा व कार्तिकच्या लव्हस्टोरीत साराची मॉम अमृता सिंग ‘विलन’ ठरल्याच्या चचार्ही जोरात होत्या. रिपोर्टनुसार, आपल्या लेकीनं करिअरवर फोकस करावा, तिने कुठल्याही गोष्टीमुळे विचलित होऊ नये, अशी अमृताची इच्छा होती. आईच्या याच इच्छेखातर म्हणा वा दबावापोटी म्हणा साराने रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.  

टॅग्स :सारा अली खानजान्हवी कपूरकरण जोहरकॉफी विथ करण 6