रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. चाहते त्यांना प्रेमाने दीपवीर असे म्हणतात. या कपलने 'कॉफी विथ करण'च्या ८ व्या सीजनला हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गुपित उघड केली. कॉफी विथ करण या कार्यक्रमासाठी दीपिका आणि रणवीर यांनी खास लूक केला होता. दोघांच्या रॉयल लूकने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. दीपिका पदुकोणने शोमध्ये घातलेल्या ड्रेस आणि नेकलेसची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल.
कॉफी विथ करण या कार्यक्रमात दीपिकाने खास व्हिक्टोरिया बेकहॅमचा ब्लॅक ड्रेस घातला होता. यावर तिनं मोकळे केस सोडले होते. यात ती खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेसची किंमत जवळपास 999 डॉलर्स म्हणजेच 83 हजार रुपये आहे. तर गळ्यात घातलेल्या कार्टियर नेकलेसने तिच्या रुपात आणखी भर टाकली.
रिपोर्टनुसार, हा 18 के रोझ गोल्ड मधला कार्टियर जस्ट अन क्लू नेकलेस 65 ब्रिलियंट-कट हिऱ्यांनी तयार करण्यात आला. या नेकलेसची किंमत 30 ते 35 लाख रुपये आहे. पण जर दीपिकाने या नेकलेसचा 'बिग मॉडेल' घातला असेल तर त्याची किंमत जवळपास 90 लाख रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
रणवीरही ऑल ब्लॅक लूकमध्ये खूपच हँडसम दिसत होता. शोचा पहिला एपिसोडही लोकांना आवडला आहे. रणवीरने करण जोहरच्या चॅट शोमध्ये दीपिकाला लग्नच्या ३ वर्षे आधी प्रपोज केल्याचा खुलासा केला. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने नोव्हेंबर २०१८ साली इटली येथे लग्न केले. या दोघांच्या लग्नातील अनसीन फोटो 'कॉफी विथ करण' या शोमध्ये दाखविण्यात आले आहेत.