Join us

Koffee With Karan 8 : शुबमन गिलबरोबर डेटिंगच्या चर्चांवर साराने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाली, "तुम्ही सगळे चुकीच्या..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 1:17 PM

शुबमन गिल नक्की कोणाला डेट करतोय? सारा अली खान म्हणाली...

'कॉफी विथ करण'चं नवं पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. करण जोहरचं 'कॉफी विथ करण ८' हे पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या शोच्या नवीन भागात स्टार किड्स हजेरी लावणार आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे सहभागी होणार आहेत. याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण, यामध्ये सारा शुबमन गिलबद्दल बोलताना दिसत आहे. 

भारताचा स्टार क्रिकेटर शुबमन गिल सध्या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून शुबमन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता. शुबमनच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. कधी त्याचं नाव सारा अली खान तर कधी सारा तेंडुलकरबरोबर जोडलं गेलं. पण, शुबमन नक्की कोणत्या साराला डेट करत होता, यावर मात्र त्याने अद्याप भाष्य केलेलं नाही. सारा खानबरोबरचे त्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे शुबमन आणि साराच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. शुबमन गिलबरोबर डेटिंगच्या चर्चांवर साराने मौन सोडत कॉफी विथ करणमध्ये भाष्य केलं आहे. 

या शोच्या नव्या प्रोमोमध्ये करण साराला शुबमन गिलला डेट करण्याबाबत प्रश्न विचारतो. यावर सारा म्हणते, "तुम्ही चुकीच्या साराला पकडलं आहे. सारा का सारा दुनिया गलत सारा के पिछे पडा है". साराच्या या वक्तव्यामुळे ती शुबमनला डेट करत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल डेट करत असल्याच्या चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या आहेत. 

दरम्यान,वर्ल्ड कपच्या सामान्यांदरम्यान सारा तेंडुलकर शुबमन गिलला चिअर करताना दिसून आली. सामन्यादरम्यानचे तिचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले होते. त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. 

टॅग्स :सारा अली खानशुभमन गिलसारा तेंडुलकर