Join us

"तो फॅमिली मॅन", बॉयफ्रेंड शिखर पहाडियाबद्दल पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 3:43 PM

करणच्या शोमध्ये जान्हवीने शिखरबाबतच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं आहे. 

श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. २०१८मध्ये जान्हवीने 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक सुपरहिट सिनेमांत ती झळकली. बॉलिवूडमधील करिअरबरोबरच जान्हवी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.  सध्या जान्हवीचं नाव शिखर पहाडियाबरोबर जोडलं गेलं आहे. त्यांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पार्टीबरोबरच अनेक सार्वजनिक स्थळीदेखील जान्हवी आणि शिखरला एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. आता पहिल्यांदाच जान्हवीने बॉयफ्रेंडबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. 

जान्हवीने नुकतीच बहीण खुशी कपूरसह करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये जान्हवीने वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिने शिखरबरोबर ब्रेकअप केल्यानंतर काही व्यक्तींना डेट केल्याचंही सांगितलं. पण, कोणाबरोबरच न जमल्यामुळे जान्हवी आणि शिखर पुन्हा रिलेशनशिपमध्ये आले. त्यानंतर जान्हवीने कधीच शिखरबद्दल भाष्य केलं नव्हतं. आता करणच्या शोमध्ये तिने शिखरबाबतच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं आहे. 

बॉयफ्रेंड शिखर पहाडियाबाबत बोलताना जान्हवी म्हणाली, "तो परफेक्ट फॅमिली मॅन आहे. तो नेहमीच मी, खुशी आणि डॅडच्या मदतीसाठी सपोर्ट सिस्टमसारखा धावून येतो. मी आजपर्यंत कुठल्याच मुलाला एका दुसऱ्या व्यक्तीसाठी प्रतिष्ठित मार्गाने मदत करताना पाहिलेलं नाही." 

याच शोमध्ये जान्हवीने स्वत:ची पोलखोल करत शिखरला डेट करत असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं. करणच्या रॅपिड फायरमधील गुगलीवर जान्हवी पुरती फसली. करणच्या "फोनमधील स्पीड डायलमधील तीन नंबर सांग", या प्रश्नाचं उत्तर देताना जान्हवीने शिखरचं नाव घेतलं. 

टॅग्स :जान्हवी कपूरकरण जोहरसेलिब्रिटी