रणवीर सिंह हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी', 'रामलीला', 'सिम्बा', 'सूर्यवंशी', 'गली बॉय' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारून रणवीरने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. पण, त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करु शकले नाही. अलीकडेच, रणवीरने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या सेलिब्रिटी चॅट शोच्या 8 व्या सीझनमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यानं सलग तीन फ्लॉप झालेल्या चित्रपटांवर भाष्य केलं.
करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच एकत्र आले होते. यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. शिवाय, सलग तीन चित्रपट फ्लॉप झाल्याने त्रास झाल्याचं त्यानं सांगितलं.
रणवीर सिंह म्हणाला, ''83' हा चित्रपट खूप छान होता. पण, तो फक्त चुकीच्या काळात रिलीज झाला. रिलीजच्या 48 तास आधी ओमिक्रॉनमुळे सर्व बंद झालं होतं. यानंतर 'जयेशभाई जोरदार' आणि 'सर्कस' चित्रपटही चांगली कामगिरी करु शकले नाही. मी सलग तीन मोठे फ्लॉप कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे ते माझ्यासाठी नवीन होते. या काळात खूप त्रास सहन करावा लागला'.
रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो नुकताच 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या चित्रपटात पाहायला मिळाला होता. शिवाय तो फरहान अख्तरच्या 'डॉन 3' मध्ये पाहायला मिळणार आहे.