Join us

'कोई मिल गया' मधील छोटा बिट्टू सरदार आठवतो का? आता दिसू लागलाय हृतिकसारखाच हॅंडसम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 5:57 PM

'कोई मिल गया' या सिनेमात हंसिका मोटवाणी, अनुज पंडित शर्मा, मोहित मक्कड, ओमकार पुरोहिट, जय चौकसी आणि प्रणिता विश्नोईने बाल कलाकार म्हणून काम केलं होतं.

आजपासून साधारण २० वर्षाआधी २००३ मध्ये बॉलिवूड स्टार्स हृतिक रोशन आणि प्रिती झिंटा स्टारर 'कोई मिल गया' (Koi Mil Gaya) सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. राकेश रोशन यांनी लागोपाठ ७ सोलो सिनेमे फ्लॉप देणाऱ्या हृतिकचं डुबणारं करिअर वाचवलं. 'मेन्टल डिसेबिलिटी' सारख्या वेगळ्या विषयावर त्यांनी चांगला सिनेमा केला होता. हृतिक आणि प्रितीसोबतच या सिनेमात काही चाइल्ड आर्टिस्टही होते. 

या सिनेमात हंसिका मोटवाणी, अनुज पंडित शर्मा, मोहित मक्कड, ओमकार पुरोहिट, जय चौकसी आणि प्रणिता विश्नोईने बाल कलाकार म्हणून काम केलं होतं. यातील बिट्टू म्हणजे अनुज पंडित शर्मा सिनेमात महत्वाच्या भूमिकेत होता. तो रोहितचा म्हणजे हृतिकचा मित्र होता. आज अनुज पंडित शर्मा मोठा झाला आहे. 

अनुज पंडित शर्माने कोई मिल गयामध्ये रोहितच्या बेस्ट फ्रेन्डची  भूमिका केली होती. बिट्टू फारच मस्तीखोर दाखवला होता. पण रोहितची सतत साथ देतो. सिनेमातील तो मस्तीखोर लहान मुलगा आता बराच मोठा झाला आहे आणि हृतिकसारखा हॅंडसम दिसू लागला आहे. 

२० वर्षाआधी जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला होता तेव्हा अनुज पंडित शर्मा केवळ ११ वर्षांचा होता. आज २० वर्षांनंतर सगळं काही बदललं आहे. अनुजही आता ३१ वर्षांचा तरूण झाला आहे. इतकंच नाही तर तो काही सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्येही दिसला आहे. तो सोशल मीडियावरही चांगला अॅक्टिव राहतो.

अनुज पंडित शर्म २००३ मध्ये हॉरर सिनेमा 'डरना मना है' मध्ये दिसला होता. त्यानंतर एक महिन्याने तो कोई मिल गयामध्ये दिसला होता. २०१४ मध्ये तो 'टोटल सियापा' सिनेमात दिसला होता. टीव्हीवरील करिअरबाबत बोलायचं तर अनुजने 'हिरो: भक्ति ही शक्ति है', 'हुकुम मेरे आका', 'बच्चों की अदालत', 'क्राइम पेट्रोल', 'आदत से मज़बूर' आणि 'परवरिश सीज़न 2' मध्ये काम केलं. अनुजने 'बामिनि एंड बॉयज़' वेबसीरिजही केली आहे. अनुज पंडितचं सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोईंग आहे आणि आकर्षक लूकने तो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.  

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी