Join us

"बहिष्कार हुआ, बलात्कार हुआ, पुरुष के वैशिपन से...", डॉक्टर बलात्कार प्रकरणी आयुषमानची कवितेतून परखड टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 2:02 PM

"अगर मै एक लड़का होती, शायद आज मै जिंदा...", डॉक्टर बलात्कार प्रकरणी आयुषमानची कवितेतून परखड टीका

Kolkata Doctor Rape Murder Case :  पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल काॅलेजमध्ये शिकणाऱ्या महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या (Kolkata Doctor Rape Murder Case) केल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी समोर आली. या क्रूरतेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. देशभरातुन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. याबाबत सेलिब्रिटीही सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

आयुषमानने त्याच्या सोशल मीडियावरुन व्हिडिओ शेअर करत या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. "काश मैं भी लड़का होती..." अशी कविता करत त्याने दु:ख व्यक्त करत परखड टीकाही केली आहे. 

आयुषमान खुराणा व्हिडिओत म्हणतो...

मै भी बिना कुंडी लगाकर सोतीकाश मै भी लड़का होती...

झल्ली बनकर दौडती रहतीसारी रात दोस्तो के साथ फिरती...काश मै भी लड़का होती...

कहते सुना है सबको कीलड़की को पढाओ लिखाओ, सशक्त बनाओऔर जब पढ़ लिखकर डॉक्टर बनतीमेरी मा ना खोती उसकी आँखो का मोतीकाश मै भी लड़का होती...

३६ घंटे का लगातार कार्य दुश्वार हुआबहिष्कार हुआ, बलात्कार हुआपुरुष के वैशिपन से साक्षात्कार हुआकाश उन पुरुषो मे भीथोडे से स्त्रीपन की कोमलता होतीकाश मै ही लड़का होती...

कहते है CCTV नहीं था, होता भी तो क्या होता...एक पुरुष सुरक्षाकर्मी जो उसपे नजर रखताउसकी नजर भी कितनी पाक होतीकाश मै एक लड़का होती...

अगर मै एक लड़का होती...शायद आज मै जिंदा होती

दरम्यान, डॉक्टर विद्यार्थिनीवर बलात्कार करुन खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. त्याचबरोबर या प्रकरणी देशभरातील लोक आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. विविध सरकारी रुग्णालयांमधील शिकाऊ डॉक्टर, अंतर्वासित डॉक्टर आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर निदर्शने करत आहेत. दोषींना शिक्षा होईपर्यंत निदर्शने सुरूच ठेवणार असल्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाचा एका आठवड्यात तपास करण्यात पोलिसांना अपयश आल्यास, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले जाईल, असे जाहीर केले आहे. 

टॅग्स :आयुषमान खुराणासेलिब्रिटीपश्चिम बंगाल