कृष्णा अभिषेक म्हणतो, मीच बनणार मामा ‘गोविंदा’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 4:08 PM
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. इंडस्ट्रीतील प्रत्येक बडा डायरेक्टर कुठली ना कुठली सत्यकथा बायोपिकच्या रूपात प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यास सज्ज ...
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. इंडस्ट्रीतील प्रत्येक बडा डायरेक्टर कुठली ना कुठली सत्यकथा बायोपिकच्या रूपात प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यास सज्ज आहे. लवकरच अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटात संजय दत्तची व्यक्तिरेखा जिवंत करतोय. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत असताना आणखी एका अभिनेत्याच्या आयुष्यावर बायोपिक येणार असल्याची चर्चा आहे.होय, येत्या काळात संजय पाठोपाठ कॉमेडीचा किंग गोविंदाचे बायोपिक प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. विशेष म्हणजे, या बायोपिकमध्ये गोविंदाची भूमिका कोण अभिनेता साकारणार, हेही ठरले आहे. किंबहुना माझ्याशिवाय ही भूमिका कुणी साकारूच शकत नाही, असा या अभिनेत्याचा दावा आहे. हा अभिनेता कोण तर गोविंदा याचा भाचा कृष्णा अभिषेक. होय, एका ताज्या मुलाखतीत कृष्णा आपला मामा गोविंदाच्या बायोपिकवर बोलला. बॉलिवूडचा कुठलाच कलाकार गोविंदाजीच्या बायोपिकला न्याय देऊ शकत नाही. पण गोविंदांवर बायोपिक आलेच तर मेकर्सची पहिली चॉईस मीच असेल. ‘संजू’साठी रणबीर कपूर हा मेकर्सची पहिली चॉईस होता़ अशाप्रकारे गोविंदांच्या बायोपिकसाठी माझ्यापेक्षा सर्वोत्कृष्ट चॉईस दुसरी कुठली असूच शकत नाही. आमच्या कॉमेडीची स्टाईल एकसारखी आहे. मी गोविंदांची कॉपी करतो, असे नसून ते आमच्या रक्तातचं आहे. त्यांची भूमिका पडद्यावर साकारून मी त्यांना ट्रिब्यूट देऊ शकतो, असे कृष्णा यावेळी म्हणाला.कृष्णा सध्या ‘तेरी भाभी है पगले’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे.ALSO READ : गोविंदाच्या कुटुंबाने भाचा कृष्णा अभिषेकसोबत तोडले सगळे संबंध! कृष्णानेही केला असा पलटवार!खरे तर अलीकडे कृष्णा व गोविंदा यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. दोघांमधीन मामा भाच्याचे नातेही संपुष्टात आले आहे. कालपरवा गोविंदाची पत्नी सुनीता हिनेच तसे जाहिर केले होते. कृष्णाच्या मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीत तुम्ही नव्हता, यामागे काही खास कारण होते का, असा प्रश्न गोविंदाची पत्नी सुनीताला केला गेला होता. यावर बोलताना तिने हे नाते आता पूर्णपणे तुटल्याचे सांगितले होते. गत ३ जूनला कृष्णाच्या घरी वाढदिवसाची पार्टी होती. त्यावेळी आम्ही लंडनमध्ये होतो. पण या पार्टीला आम्ही हजर नसण्याचे केवळ हे एकच कारण नव्हत. मुळात आम्हाला या पार्टीचे निमंत्रणचं नव्हते. कृष्णाने बोलवले असते, तरी आम्ही गेलो नसतोच. आम्ही अजूनही कृष्णाच्या मुलांना पाहिलेले नाही. याचे कारण कृष्णा व त्याखी पत्नी कश्मीरा हे दोघे आहेत. गोविंदा बरोबर होता. पण मीच कृष्णाला दुसरी संधी दिली होती. आता आम्हाला त्या कुटुंबासोबत कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत,असे सुनीता म्हणाली होती.