बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफची लेक आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिने बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहणे पसंत केले. पण म्हणून ती कमी ग्लॅमरस नाही. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. कधी या बोल्ड फोटोंमुळे तर कधी रिलेशनशिप स्टेटसमुळे कृष्णा सतत चर्चेत असते. सध्या ती अशाच बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. होय, मालदिवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत असलेल्या तिच्या काही फोटो आणि व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एका फोटोने तर अगदी ‘हंगामा’ केला आहे.
रविवारी कृष्णाने स्कूबा डायव्हिंग करतानाचे फोटो शेअर केलेत. यानंतर काल काय तर मालदीवच्या रिझॉर्टमध्ये टू-पीस बिकलीत शॉवर घेतानाचा फोटो शेअर केला. तिचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
2020 च्या अखेरिस कृष्णाचे बॉयफ्रेन्ड एबन हायम्ससोबत बे्रकअप झाले होते. खुद्द कृष्णाने याचा खुलासा केला होता. आम्ही आता एकत्र नाहीत. त्यामुळे आम्हाला एकत्र टॅग करणे बंद करा, असे तिने लिहिले आहे.25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अॅॅॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. टायगर वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अॅॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते.
असे म्हणतात की, करण जोहरने 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ इअर’साठी कृष्णाला ऑफर दिली होती. पण कृष्णाने ही ऑफर नाकारली आणि ही भूमिका नंतर आलिया भटच्या पदरात पडली. कृष्णाला टॅटू काढण्याचा छंद आहे. शरीराच्या अनेक भागांवर तिने टॅटू गोंदवले आहेत.