Join us

ही अभिनेत्री ठरली दिग्दर्शकासाठी डोकेदुखी, अमिताभ- इमरान हाश्मीच्या सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 16:11 IST

तिच्या वाढत चालेल्या नखऱ्यांमुळे तिला हा सिनेमा गमवावा लागला आहे.

अभिनेत्री कृति खबरंदासाठी 2019 हे वर्षे चांगले गेले. अभिनेत्री क्रिती खरबंदा तिचा आगामी चित्रपट 'हाऊसफुल ४'मुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील लूक व ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तिचा 'पागलपंती' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या ती बिझी आहे. 

या दोन सिनेमाशिवाय कृति अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्य चेहरे सिनेमातदेखील दिसणार होती. मात्र आजतकच्या रिपोर्टनुसार कृतिच्या हातातून हा प्रोजेक्ट निघून गेले आहे. याचे कारण कृतिचे नखरे आहेत.

रिपोर्टनुसार कृतिला तिच्या वाढत चालेल्या नखऱ्यांमुळे हा सिनेमा गमावला आहे. कृतिने या सिनेमाचे पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे. कृतिच्या सांगण्याप्रमाणे मेकर्सनी सिनेमात अनेक बदलदेखील केले होते मात्र तरीही गोष्टी ठीक झाल्या नाहीत. कृतिचा दिग्दर्शकासोबत वाद झाला. तो वाद इतक्या टोकाला गेला की तिला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.   

कृतिने पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे त्यामुळे आता मेकर्सना काही सीन्स पुन्हा शूट करावे लागणार आहेत.  हा सिनेमा 24 एप्रिल 2020 ला रिलीज होणार आहे. 

टॅग्स :कृति खरबंदा