लिवूड अभिनेत्री कृति खरबंदा आज तिचा वाढदिवस साजरा करते आहे. ती बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यानी फारच कमी वेळेत स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कृति खरबंदाने आपल्या करिअरची सुरुवात दक्षिणात्य इंडस्ट्रीमधून केली.
कृतिचा जन्म 29 ऑक्टोबर 1990 साली दिल्लीतील पंजाबी कुटुंबात झाला. कृतिने सुरुवातचे शिक्षण दिल्लीतून घेतले त्यानंतर ती कुटुंबासोबत बंगळुरुला शिफ्ट झाली. लहानपणापासून कृतिला अभिनयात इंटरेस्ट होता. कृतिने ज्वेलरी डिझायनिंगचा डिप्लोमा केला आहे, पण कॉलेजपासून तिने मॉडेलिंग करायला सुरुवा
अभिनयाच्या सुरुवात तिने तमिळ फिल्म इंडस्ट्रीमधून केली. कृति पहिल्यांदा 'बोनी' या तमिळ सिनेमात दिसली होती हा सिनेमा 2009 ला रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फारशी कमाल दाखवू शकला नाही, मात्र तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. कृतिने चार वर्षा पूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
इमरान हाश्मीच्या 'राज: रीबूट' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तिला खरी ओळख मिळाली ती 'शादी मैं जरुर आना' या सिनेमातून. या सिनेमात ती राजकुमार रावसोबत दिसली होती. तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. कृतिने आतापर्यंत वीरे की वेडिंग, यमला पगला दीवाना फिर से, हाऊसफुल्ल 4 आणि पागलपंतीमध्ये दिसली आहे.
कृति अभिनेता पुल्कित सम्राटला टेड करते आहे. दोघे एकमेकांसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. लॉकडाऊनमध्ये दोघे एकत्र दिसले.