बॉलिवूडमध्ये आणखी एका कपलच्या प्रेमाच्या चर्चेला ऊत आला आहे. होय, आता तर या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झालेय. हे कपल कोण तर अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा. गेल्या अनेक दिवसांपासून क्रिती पुलकितला डेट करत असल्याची चर्चा होती. पण आता क्रितीने खुद्द हे नाते जगजाहिर केले आहे. एका ताज्या मुलाखतीत क्रितीने पुलकितला डेट करत असल्याच्या बातमीला दुजोरा दिला. ‘ही अजिबात अफवा नाही. आम्ही दोघे एकमेकांना डेट करत आहोत. खरे सांगायचे तर मी कुणाला तरी डेट करतेय, हे सर्वप्रथम माझ्या पालकांना मला सांगायचे होते. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. सध्या मी हॅपी प्लेसमध्ये आहे. मी पुलकित सम्राटला डेट करतेय, हे सांगताना मला कुठलाही संकोच वाट नाही, असे क्रितीने सांगितले.
क्रितीने ही कबुली दिली तेव्हा जॉन अब्राहम तिच्या बाजूला बसला होता. क्रितीने त्याचाही उल्लेख केला. आमच्या रिलेशनशिपबद्दल जाणणारा जॉन हा पहिला होता, असे तिने सांगितले. पुलकितही यावेळी हजर होता. त्याने मात्र क्रितीसोबतच्या रिलेशनशिपबद्दल काहीही बोलणे टाळले.
पुलकित सम्राट यापूर्वी यामी गौतमसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2014 मध्ये सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत पुलकितचे लग्न झाले. पण एकाच वर्षांत हे लग्न तुटले.जॉन, क्रिती खरबंदा, पुलकित सम्राट हे तिघेही ‘पागलपंती’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यांच्याशिवाय अनिल कपूर, अर्शद वारसी, उर्वशी रौतेला यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अनीज बाज्मी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
क्रितीने यापूर्वी गेस्ट इन लंदन, शादी में जरूर आना, कारवां व यमला पगला दीवाना फिर से अशा अनेक चित्रपटांत काम केले. ‘शादी में जरूर आना’ या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाची कथा लव्हस्टोरीवर आधारीत होती.