Join us

भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर भडकले बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिती आणि स्वराने असे काही सुनावले....

By अमित इंगोले | Published: October 05, 2020 1:04 PM

सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, पालकांनी त्यांच्या तरूण होत असलेल्या मुलींना संस्कार द्यावे आणि कसं वागावं हे शिकवावं. सुरेंद्र सिंह यांच्या या वक्तव्यावर अनेक सेलिब्रिटी भडकले आहेत.

हाथरसमध्ये झालेल्य गॅंगरेपमुळे देशभरातून संताप व्यक्त होतोय. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या घटनेचा निषेध केलाय.  आता या घटनेवरून राजकारण करणारे वक्तव्य सुरू झाले आहेत. भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यावर बॉलिवूड सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केलीय. सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, पालकांनी त्यांच्या तरूण होत असलेल्या मुलींना संस्कार द्यावे आणि कसं वागावं हे शिकवावं. सुरेंद्र सिंह यांच्या या वक्तव्यावर अनेक सेलिब्रिटी भडकले आहेत.

सरेंद्र सिंह यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर नाराजी व्यक्ती करत अभिनेत्री क्रिती सेननने ट्विट लिहिले की, 'मुलींना हे शिकवावं की, कसा त्यांचा रेप होईल? या माणसाला तो काय बोलतोय हे कळतंय का? ही मनासिकता बदलण्याची गरज आहे. फार गडबड आहे. हे लोक आपल्या मुलांना संस्कार का देत नाहीत?'. ( ‘हा ही बलात्काराएवढाच मोठा गुन्हा’;  प्रियंका गांधींचा ‘तो’ फोटो पाहून अभिनेत्री हेमांगी कवी भडकली)

हाथरस केसवरून सुरूवातीपासून आवाज उठवणारी अभिनेत्री स्वरा भास्करने सुरेंद्र सिंहचा एक जुना व्हिडीओ केला आहे. ज्यात सुरेंद्र सिंह भाजपा नेता कुलदीप सेंगरचा बचाव करताना दिसत आहे. तिने लिहिले की, 'हा  माणूस जुना पापी आहे. रेपचा बचाव करणारा भाजपाचा आमदार सरेंद्र सिंह'. ("मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान)

त्यासोबतच प्रसिद्ध दिग्दर्शक ओनिरने सुरेंद्र सिंहच्या वक्तव्यावर टीका करत लिहिले की, 'निशब्द झालोय आणि लोक अशा मुर्खांना निवडून देतात. एका पक्ष यांना तिकीट देतो. अशा आमदारांकडून अपेक्षा करणं कठीण आहे'. (शाहरूखवर सयानी गुप्ताने साधला निशाणा, म्हणाली - गांधीजींनी आपल्याला खरं बोलणंही शिकवलं)

कॉमेडीयन आणि अभिनेता वीर दास यानेही या आमदारांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. त्याने लिहिले की, 'मी समजू शकतो. परिवार फार गरजेचा आहे. आलकांनी आपल्या मुलाला शिकवावं की, असे घाणेरडे विचार ठेवू नये'.

१४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार

हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :हाथरस सामूहिक बलात्कारक्रिती सनॉनस्वरा भास्करबॉलिवूडभाजपा