Join us

Kriti Sanon Birthday Special: वाचा क्रिती सनॉनच्या आईने का सांगितले होते तू इथून निघून जा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 5:21 PM

क्रितीच्या स्टारडममुळे तिच्या पालकांना नुकताच कशाप्रकारे त्रास सहन करावा लागला होता याचा किस्सा तिने द कपिल शर्मा शोमध्ये सांगितला. 

ठळक मुद्देक्रिती काही महिन्यांपूर्वी तिच्या आई वडिलांसोबत एका मॉलमध्ये शॉपिंगला गेली होती. त्या मॉलमध्ये त्यावेळी सेल सुरू होता. क्रिती स्टार असताना देखील सेल मध्ये शॉपिंग करतेय... अशी चर्चा त्यावेळी तिथे सुरू झाली.

‘हिरोपंती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या क्रिती सॅननचा आज वाढदिवस असून तिने खूपच कमी कालावधीच बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. मॉडेलिंग, तेलगू चित्रपट आणि बॉलिवूड असा तिचा प्रवास राहिला. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. क्रितीच्या कुटुंबियातील कोणीच या चित्रपटसृष्टीशी संबंधित नाहीये. तिचे वडील हे सी.ए आहेत तर आई प्रोफेसर आहे. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसल्याने या क्षेत्रात स्थिरावणे तिच्यासाठी सोपे नव्हते. 

क्रितीचा अर्जुन पटियाला हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात तिच्यासोबतच दलजित दोसांज मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने क्रिती नुकतीच द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात उपस्थित राहिली होती. क्रितीच्या स्टारडममुळे तिच्या पालकांना नुकताच कशाप्रकारे त्रास सहन करावा लागला होता याचा किस्सा तिने द कपिल शर्मा शोमध्ये सांगितला. 

क्रिती काही महिन्यांपूर्वी तिच्या आई वडिलांसोबत एका मॉलमध्ये शॉपिंगला गेली होती. त्या मॉलमध्ये त्यावेळी सेल सुरू होता. क्रिती स्टार असताना देखील सेल मध्ये शॉपिंग करतेय... अशी चर्चा त्यावेळी तिथे सुरू झाली. ही चर्चा क्रितीच्या आईला अजिबातच आवडली नव्हती. त्यामुळे तिच्या आईने तिला ताबडतोप तिथून जायला सांगितले. क्रितीची आई तिला म्हणाली, तू इथून जा... म्हणजे लोक आम्हाला त्रास देणार नाहीत आणि आमची शॉपिंग व्यवस्थितपणे होईल...

क्रितीने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत आपल्या बॉलिवूड प्रवासाबद्दल देखील सांगितले होते. ती म्हणाली होती की, नोएडात मी बीटेक करत होते आणि एक दिवस अचानक हिरोईन बनण्याचे स्वप्न घेऊन एकटीच मुंबईत आले. एका अनोळखी शहरात अगदी एकटी. मी याआधी कधीच आपल्या आई-वडिलांपासून दूर राहिले नव्हते. त्यामुळे मुंबईत आईचा फोन आला की, मी रडू लागायचे. नंतर ऑडिशन्स सुरू झाले. स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या अनेकांपैकी मी सुद्धा एक होते. अनेकदा हताश झाले. स्वत:वर चिडले. पण माघार घेतली नाही. अनेकांनी मला नकार दिला. पण मी हार मानली नाही.’

टॅग्स :क्रिती सनॉन