Join us  

तो श्रीरामासारखाच साधा, सरळ आहे; आदिपुरुषमधील 'जानकी' क्रिती सेननकडून प्रभासचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 9:12 AM

क्रिती सेननने कोस्टार प्रभासचं कौतुक करताना त्याची तुलना श्रीरामाशी केली.

Adipurush : मोठ्या प्रतिक्षेनंतर काल दिग्दर्शक ओम राऊतच्या (Om Raut) 'आदिपुरुष'  सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. प्रभास (Prabhas), क्रिती सेनन (Kriti sanon), ओम राऊत आणि निर्माता भूषण कुमार यांच्या उपस्थितीत ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. सिनेमात क्रिती सेनन जानकीच्या रुपात दिसत आहे तर प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे. यावेळी क्रिती सेननने कोस्टार प्रभासचं कौतुक करताना त्याची तुलना श्रीरामाशी केली.

आदिपुरुष ट्रेलर लॉंचवेळी कलाकारांनी माध्यमांशी संवाद साधला. हा फक्त सिनेमा नाही तर एक अनुभूती आहे, खूप श्रद्धा आणि प्रेमाने चित्रपट बनवला असल्याचं कलाकारांनी यावेळी सांगितलं. दरम्यान क्रिती सेनन सहकलाकार प्रभासची स्तुती करताना म्हणाली," या भूमिकेसाठी प्रभासच योग्य निवड आहे. कारण तो प्रभू श्रीरामासारखाच मनाने सरळ, साधा आहे."

'आदिपुरुष'चा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस पडला असून मोठ्या पडद्यावर सिनेमा बघण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १६ जून रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये सिनेमा रिलीज होत आहे. 

क्रिती आणि प्रभास रिलेशनशिपमध्ये ?

'आदिपुरुष' सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्यापासूनच क्रिती आणि प्रभास एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. वरुण धवनने एका कार्यक्रमात तशी हिंटही दिली. मात्र अद्याप प्रभास किंवा क्रिती दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. तरी दोघांची जोडी चाहत्यांना भलतीच पसंतीस पडली आहे.

टॅग्स :क्रिती सनॉनआदिपुरूषप्रभासबॉलिवूडसिनेमा