Join us

डेटिंगच्या चर्चेदरम्यान क्रिती सनॉनने प्रभासबद्दल व्यक्त केल्या भावना, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 13:38 IST

Kriti Sanon And Prabhas : ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष'मध्ये प्रभाससोबत क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरुष(Adipurush)मध्ये प्रभास(Prabhas)सोबत क्रिती सनॉन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आदिपुरुष चित्रपट रामायणावर आधारीत आहे. या चित्रपटात प्रभास रामाच्या भूमिकेत तर क्रिती सनॉन सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग दिसणार आहे. दरम्यान आदिपुरुष चित्रपटाच्या निमित्ताने क्रिती सनॉनने मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने प्रभासची प्रशंसा केली. 

क्रिती सनॉने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी प्रभासबद्दल ऐकले होते की, तो स्वतःमध्ये मग्न असतो. मात्र मी जेव्हा त्याला भेटले तेव्हा तो मला लाजाळू स्वभावाचा वाटला. मी सुरुवातीला त्याच्यासोबत बोलायला सुरुवात केली. मी त्याला सांगितले की, माझा पहिला चित्रपट तेलगू होता. माहित नसलेल्या भाषेतील चित्रपटात अभिनय करणे खूपच कठीण असते. हे मी सांगितल्यावर तो हळूहळू माझ्यासी मनमोकळेपणाने बोलू लागला.

प्रभासचे डोळे आहेत खूप बोलके ती पुढे म्हणाली की, प्रभास अतिशय साधा आणि डोक्यात हवा न गेलेला कलाकार आहे. त्याचे डोळे खूप बोलके आहेत आणि स्वभावही खूप शांत आहे. त्याचा हा स्वभाव पाहता त्याच्याशिवाय रामाची भूमिका इतर कुणी करु शकतो, यावर मी विश्वास ठेवू शकणार नाही.

आदिपुरुष १६ जूनला होणार रिलीजओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हिंदी आणि तेलगूमध्ये एकत्र शूट केला आहे. यात प्रभास आणि क्रिती सनॉन व्यतिरिक्त सैफ अली खान, देवदत्त नागेदेखील मुख्य भूमिकेत आहे. ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागड्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट १६ जूनला रिलीज होणार आहे.

वर्कफ्रंट...वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर क्रिती सनॉन सध्या बऱ्याच प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. ती आदिपुरुष व्यतिरिक्त शहजादा, गणपथ आणि अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तर प्रभासदेखील सालार चित्रपटासाठी चर्चेत आहे.

टॅग्स :प्रभासक्रिती सनॉनआदिपुरूष