सध्या बॉलिवूडमध्ये लग्नसराई सुरु आहे. एका पाठोपाठ एक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच आता अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon ) हिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. क्रिती सनॉन येत्या 2025 मध्ये मध्ये रुमर्ड बॉयफ्रेंड बिझनेसमॅन कबीर बहिया (Kabir Bahia) याच्यासोबत लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. कबीर बहिया हा भारतीय क्रिकेटपटू एम. एस. धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षीचा (Sakshi Dhoni) चुलत भाऊ आहे. नुकतंच एका कार्यक्रमात क्रिती ही कबीर, साक्षी आणि धोनीसोबत वेळ घालवताना दिसून आली आहे. त्यामुळे या चर्चांनी आणखी जोर धरला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये क्रिती ही हॉट गुलाबी साडीमध्ये कबीरच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत दिसतेय. या फोटोंमध्ये ती साक्षी धोनीसोबत गप्पा मारताना दिसली आहे.
अनेक वर्षांपासून क्रितीने तिचे लव्ह लाईफ खाजगी ठेवले आहे. क्रिती आणि कबीर हे अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. अलिकडेच कबीरसोबत क्रिती सेनॉनने ग्रीसमध्ये आपला 34 वा वाढदिवस साजरा केला होता. क्रितीही साक्षी आणि धोनीसोबत पाहायला मिळाली आहे. क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'तेरे इश्क में', 'हाऊसफुल 5' आणि 'भेडिया 2' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.