Join us

प्रभाससोबतच्या डेटिंगच्या चर्चेदरम्यान Kriti Sanonनं सांगितलं बॉयफ्रेंडचं नाव, वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:20 AM

Kriti Sanon : अभिनेत्री क्रिती सनॉनचा नुकताच शहजादा चित्रपट रिलीज झाला.

अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) सध्या तिच्या 'शहजादा' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. क्रिती आणि कार्तिक आर्यन स्टारर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. मात्र, 'शहजादा' प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरला आणि त्यामुळेच या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरतो आहे. 'शहजादा' व्यतिरिक्त क्रिती सनॉन साऊथचा सुपरस्टार प्रभाससोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच प्रभास आणि क्रितीच्या एंगेजमेंटची बातमी समोर आली होती. या दोघांची मालदीवमध्ये एंगेजमेंट होऊ शकते, असा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. तथापि, नंतर प्रभास आणि क्रितीच्या टीमने हे वृत्त फेटाळून लावले आणि त्या अफवा असल्याचे म्हटले.

क्रिती सनॉनने अलीकडेच तिच्या प्रियकराचे नाव सोशल मीडिया पोस्टद्वारे उघड केले. क्रितीने नुकतेच तिच्या चाहत्यांसोबत 'आस्क मी' सेशन केले. यावेळी चाहत्यांनी अभिनेत्रीला विविध प्रकारचे प्रश्न विचारले. तर तिथे एका चाहत्याने अभिनेत्रीला तिच्या बॉयफ्रेंडचे नाव विचारले. यावर क्रितीने प्रतिक्रिया देताना एक व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, "हे एक रहस्य आहे... अगदी माझ्यासाठीही." हे उत्तर दिल्यानंतर क्रिती जोरजोरात हसायला लागली.

'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता वरुण धवन क्रितीला प्रभासच्या नावाने चिडवताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी प्रभास आणि क्रिती एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावला. यावर प्रतिक्रिया देताना क्रितीने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, हे प्रेम नाही आणि नाही पीआर...आहे. आमचा भेडिया रिएलिटी शोमध्ये थोडासा जंगली झाला होता. या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही.

टॅग्स :क्रिती सनॉनप्रभास