Join us

क्रिती सनॉन सिद्धिविनायकाच्या चरणी, "तेरी बातों में ऐसा उलझा जिया" रिलीज होण्यापूर्वी घेतलं बाप्पाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 3:15 PM

''तेरी बातों में ऐसा उलझा जिया'' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

अभिनेत्री क्रिती सनॉन  (Kriti Sanon) आणि शाहीद कपूर (Shahid Kapoor) यांच्या  ''तेरी बातों में ऐसा उलझा जिया'' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. व्हॅलेंटाईनच्या मुहुर्तावर हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या क्रिती सनॉनने  मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

क्रिती सनॉननं बाप्पाचे दर्शन घेतलं. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी क्रिती सिद्धिविनायकाकडे साकडं घालायला गेली असे म्हटले जात आहे. यावेळी क्रितीने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. यात ती खूपच सुंदर दिसत होती. क्रिती सनॉन अनेकदा देवाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसते. क्रिती गेली अनेक वर्षे बाप्पाच्या दर्शनाला जाते.  'मिमी' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर क्रिती सनॉन  सिद्धीविनायकच्या चरणी नतमस्तक झाली होती. चित्रपटाला यश मिळावे यासाठी अनेक सेलिब्रिटी देवांचे दर्शन घेताना दिसून येतात.

''तेरी बातों में ऐसा उलझा जिया'' सिनेमामध्ये क्रिती रोबोट आहे. तर शाहीद रोबोटच्याच प्रेमात पडतो अशी मजेशीर कथा दाखवण्यात आली आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी तर चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. दोघांची केमिस्ट्रीही चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे. ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच पडद्यावर बघायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर याआधी क्रिती 'गणपत' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात ही अभिनेत्री टायगर श्रॉफसोबत दिसली होती. 

टॅग्स :क्रिती सनॉनसेलिब्रिटीबॉलिवूडमुंबई