‘हिरोपंती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री क्रिती सॅनन आजघडीला इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे. मॉडेलिंग, तेलगू चित्रपट आणि बॉलिवूड असा तिचा प्रवास राहिला. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. क्रितीने अलीकडे आपल्या बॉलिवूड प्रवासाबदद्ल सांगितले. तिने सांगितले की, नोएडात मी बीटेक करत होते आणि एक दिवस अचानक हिरोईन बनण्याचे स्वप्न घेऊन एकटीने मुंबईत आले. एका अनोळखी शहरात अगदी एकटी. मी याआधी कधीच आपल्या आई-वडिलांपासून दूर राहिले नव्हते. त्यामुळे मुंबईत आईचा फोन आला की, मी रडू लागायचे. नंतर ऑडिशन्स सुरु झालेत. स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या अनेकांपैकी मी सुद्धा एक होते. अनेकदा हताश झाले. स्वत:वर चिडले. पण माघार घेतली नाही. अनेकांनी मला परफेक्ट नाही म्हणून नकार दिला.’
तिने सांगितले की, एकदाचा किस्सा मला आठवतो. अनेक ऑडिशन्स दिल्यानंतर मला एक संधी मिळाली. मी त्या व्यक्तिला भेटायला पोहोचली. क्रिती तू खूप सुंदर आहेस. पण स्क्रिनवर लोक तुला बघतील तेव्हा काहीतरी रिअल वाटायला हवे, असे ती व्यक्ति मला म्हणाली. हे ऐकून मी निराश झाले.
यादरम्यान काही साऊथचे सिनेमे केलेत. अनेक संघर्षानंतर मला ‘हिरोपंती’ मिळाला. मला आजही तो दिवस आठवतो. ‘हिरोपंती’साठी मोठ्या प्रमाणात ऑडिशन सुरु होते. कॅमेरा, लाईट्स, मेकअप आणि संपूर्ण कॉस्च्युमसोबत मला डायलॉग म्हणायला दिले गेलेत. त्याचवेळी मी पहिल्यांदा टायगरला बघितले. आम्ही एकत्र सीन केला. ऑडिशननंतर लगेच मला साजिद नाडियाडवाला सर तुम्हाला भेटणार, असे आम्हाला सांगितले गेले. यानंतर आम्ही वाटेत असतानाच, हा चित्रपट मला मिळाल्याची बातमी दिली गेली. एकक्षण विश्वास वाटेना. मी कारमधूनच आईला फोन केला. मी साजिद यांच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांनी चॉकलेटचा बॉक्स देऊन माझे स्वागत केले. मी चित्रपट साईन केला आणि माझा प्रवास सुुरू झाला. कदाचित माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी अशाच अनपेक्षितरित्या घडतात.
लवकरच आशुतोष गोवारीकर यांचा 'पानीपत' हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सॅनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात क्रिती सदाशिवराव यांची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिकेत दिसणार आहे. पार्वतीबाई पानीपत संग्रामाच्यावेळी पतीसमवेत प्रत्यक्ष रणभूमीवर गेल्या होत्या.