Join us

माझ्या हृदयाचा एक भाग तुझ्यासोबत गेला... सुशांतच्या आठवणीत क्रिती सॅननची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 10:28 AM

सुशांत व क्रिती कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते, असे मानले जाते. अर्थात दोघांनीही कधीच याची कबुली दिली नाही. 

ठळक मुद्देसुशांतच्या मृत्यूनंतर क्रितीला अनेकांनी ट्रोल केले होते.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या सर्वांना चटका लावून गेली. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचे अनेक स्टार्स भावूक पोस्ट लिहित आहेत. अभिनेत्री क्रिती सॅनन हिनेही एक भावुक पोस्ट लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय. सुशांत व क्रिती कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते, असे मानले जाते. अर्थात दोघांनीही कधीच याची कबुली दिली नाही. दोघांनीही ‘राब्ता’ या सिनेमात एकत्र काम केले होते. याचदरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या होत्या. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने क्रिती शॉक्ड आहे. सुशांत अखेरचा निरोप देताना क्रिती हजर होती.

आता तिने इन्स्टावर सुशांतसाठी एक पोस्ट लिहिली आहे. शिवाय सुशांतसोबत घालवलेल्या क्षणांचे सुंदर फोटोही शेअर केले आहेत.   ‘सुश ... मला माहित आहे तुझा तल्लख मेंदूच तुझा सर्वात चांगला मित्र आणि तुझा सर्वात वाईट शत्रू होता. परंतु, एक क्षण असा आला की, तुला जगण्यापेक्षा मृत्यू अधिक सोपा वाटला़ तुझ्या त्या कठीण काळात तुझ्यासोबत असे काही लोक असायला हवे होते,जे तुला मदत करू शकले असते. जे लोक तुझ्यावर खूप प्रेम करतात त्यांना तू दूर करायला नको होते. तुला जो काही त्रास होत होता, तो मी दूर करू शकले असते तर... परंतु तसे काहीही मला करता आलेले नाही.  माझ्या हृदयाचा एक भाग तुझ्यासोबत गेला आहे आणि दुस-या भागात तू सदैव जिवंत राहशील. मी कायम तुझ्या आनंदासाठी प्रार्थना केली आणि करत राहिन,’ असे क्रितीने लिहिले आहे.सुशांतच्या मृत्यूनंतर क्रितीला अनेकांनी ट्रोल केले होते.

क्रिती झाली होती ट्रोल, बहिणीने व्यक्त केला होता संताप

सुशांतची इतकी जवळची मैत्रिण असूनही तो गेल्यानंतर तिने सोशल मीडियावर त्याला साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही, हे पाहून नेटक-यांनी क्रितीला ट्रोल केले होते.तिची बहीण नुपूर हिने या ट्रोलर्सला खरमरीत उत्तरही दिले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहिली नाही, म्हणून लोक आम्हाला ट्रोल करत आहेत. आम्हाला निर्दयी वगैरे म्हणत आहेत. तुमची परवानगी असेल तर आम्ही दोन अश्रू गाळू शकतो प्लीज, अशा शब्दांत नुपूरने संताप व्यक्त केला होता.

टॅग्स :क्रिती सनॉनसुशांत सिंग रजपूत