Join us

Kriti Sanon : बॉलिवुड अभिनेत्रींनाही उर्फीची भूरळ, क्रिती सेननचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 3:06 PM

क्रिती एका ठिकाणी प्रमोशनसाठी दाखल झाली असता तिला बघून चाहत्यांना प्रश्नच पडला. क्रिती आहे की उर्फी अशी शंका नेटकऱ्यांना आली.

Kriti Sanon : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या विचित्र कपड्यांमुळे ट्रोल होत असते. मात्र आता बॉलिवुड (Bollywood) अभिनेत्रीही उर्फीसारखेच कपडे घालताना दिसत आहेत. अभिनेत्री क्रिती सेननचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिने घातलेल्या आऊटफिट वरुन उर्फीचीच आठवण येते.

क्रिती सेनन आगामी 'शहजादा' सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. कार्तिक आर्यनसोबत (Kartik Aryan) ती शहजादामधून (Shehzada) भेटीला येणार आहे. दोघेही सध्या शहजादाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. क्रिती एका ठिकाणी प्रमोशनसाठी दाखल झाली असता तिला बघून चाहत्यांना प्रश्नच पडला. क्रिती आहे की उर्फी अशी शंका नेटकऱ्यांना आली. क्रितीने निळा भडक ड्रेस घातला आहे. ड्रेसवर समोरुन अनेक कट आहेत. अगदी असेच ड्रेस उर्फी घालताना दिसते. तिने केस वर बांधले असून गोल्डन हिल्स आणि गोल्डन कानातले घातले आहेत. 

उर्फीने थेट कंगनालाच शिकवली अक्कल; तर कंगनानेही केला जबरदस्त पलटवार, म्हणाली, 'प्रिय उर्फी...'

क्रितीच्या या व्हिडिओवरुन युझर्सने तिला भलतंच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 'तू सुद्धा आता उर्फी बन' अशी कमेंट एकाने केली आहे. हेच जेव्हा उर्फी घालते तेव्हा तिला ट्रोल केले जाते असं म्हणत एकाने उर्फीची बाजू घेतली आहे. 

टॅग्स :क्रिती सनॉनउर्फी जावेदफॅशनट्रोलसोशल मीडिया