अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) लंडनमधील बिझनेसमन कबीर बहियाला डेट करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच क्रितीने तिचा वाढदिवस ग्रीसमध्ये साजरा केला. यावेळी तिच्यासोबत तिची बहीणही होती. शिवाय कबीर बहियाही दिसला. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता नुकतंच भारतात आल्यावर क्रितीने या चर्चांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
क्रिती सेनन लवकरच बॉयफ्रेंड कबीर बहियासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या चर्चा निराशाजनक असल्याचं ती म्हणाली. एका मुलाखतीत क्रिती म्हणाली, "जेव्हा एखादी खोटी अफवा पसरवली जाते तेव्हा मला खूप राग येतो. कारण याचा परिणाम कुटुंबातील इतर सदस्यांवरही होतो. या अफवा वैयक्तिक आयुष्याशी जोडलेल्या असतात. मग असे मेसेज मला मित्र पाठवतात आणि विचारतात की हे खरं आहे का? मग मला हे खोटं नसल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं."
ती पुढे म्हणाली, "लोक अनेकदा अफवा पसरवताना तथ्य तपासून घेत नाहीत. विशेषत: सोशल मीडियावर नकारात्मकता वेगाने पसरते. सातत्याने खोट्याला खरं करण्याचा प्रयत्न त्रास देणारा आहे. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा ही गोष्ट खूप त्रासदायक आहे."
क्रिती सेननचे यावर्षी 'तेरी बातो मे ऐसा उललझा जिया','क्रू' हे सिनेमे रिलीज झाले. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.